Published On : Tue, Feb 25th, 2020

सातबारा फेरफार ऑनलाईन प्रक्रिया ग्रामीण तहसील कार्यालयाशी संलग्नित – ठाकरे

नागपूर, : जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावरील भूमी अभिलेख कार्यालयांची सात बाराचे ऑन लाईन फेरफार बनविण्याची प्रक्रिया सुरु असून, ती सर्व तहसील कार्यालयांशी संलग्नित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण, हिंगणा, रामटेक, मौदा, भिवापूर, पारशिवनी, कुही, काटोल, नरखेड, कळमेश्वर, उमरेड, सावनेर आणि कामठी या सर्व ग्रामीण तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांची लिंक फेरफार करण्यासाठी संबंधित तहसील कार्यालयाशी जोडण्यात आलेली आहे. या सर्व क्षेत्रातील सात बारा उता-यांवरील ऑनलाईन फेरफारचे कामकाज सुरळीत सुरु आहे. मात्र ही ऑनलाईन प्रक्रिया नागपूर महानगर क्षेत्रासाठी नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement