Published On : Tue, Feb 25th, 2020

सीएए, एनआरसी, एनपीए हा व्हायरस आहे तो थांबवा

– प्रकाश गजभिये यांचे केंद्रसरकारच्या विरोधात विधानभवन परिसरात आंदोलन

मुंबई : सीएए, एनआरसी, एनपीए हा व्हायरस आहे तो थांबवा अशा आशयाचा फलक घेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केंद्रसरकारच्या विरोधात आज विधानभवनात आंदोलन केले.

Advertisement

नागरिकांवर लादलेल्या सीएए, एनआरसीला विरोध दर्शवणारे फलक दाखवून आमदार प्रकाश गजभिये यांनी निषेध नोंदवला.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केंद्रसरकारने नागरिकांवर लादलेल्या सीएए, एनपीए एनआरसीला विरोध दर्शवणारे फलक दाखवून निषेध नोंदवला. तसेच भारत हा शांतताप्रिय देश असताना याठिकाणी सीएए, एनपीआर आणि एनआरसी कायद्याची गरजच काय असा सवाल माध्यमांशी बोलताना उपस्थित करत हा व्हायरस तातडीने थांबवावा अशी मागणी केली.

शाहू , फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. पण अशा महाराष्ट्रात रोज मोर्चे काढले जात आहेत. हे सर्व थांबायला हवे. सीएए, एनपीआर आणि एनआरसी हे सर्व कायदे केंद्रसरकार जिथे राबवायचे असेल तिथे राबवा परंतु हे कायदे महाराष्ट्रात लागू करू नका अशी जोरदार मागणीही आमदार प्रकाश गजभिये यांनी आंदोलनाच्या माध्यमातून केली.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement