Published On : Tue, Feb 25th, 2020

स्वतंत्र मजदूर युनियन शाखा कन्हान यांची कार्यकारिणी घोषित.

कन्हान : – नगरपरिषद कार्यालयाच्या आवारात श्री नरेंद्र जारोंडे प्रसिद्धी सचि व नागपूर जिल्हा स्वतंत्र मजदूर युनियन यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कन्हा न-पिपरीच्या कार्यकारिणीची निवड करून घोषित करण्यात आली.

नुकतीच स्वतंत्र मजदूर युनियनची सभा कन्हान नगरपरिषद येथे घेऊन नाग पूर जिल्हाचे प्रसिद्धी सचिव श्री. नरेंद्र जारोंडे व प्रमुख पाहुणे म्हणून सचिव संघटक श्री.गणेश उके, प्रकाश पवार कोषाध्यक्ष नागपूर जिल्हा तसेच संघमि त्रा ढोके प्रादेशिक अध्यक्ष ह्यांच्या उप स्थितीत नगरपरिषद कन्हान – पिपरीचे पदाधिकारी व सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत संघातर्फे पाहुण्यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अतिथीनी कर्मचाऱ्यांच्या समस्या वर मार्गदर्शन करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. प्रास्ताविक स्वतंत्र मजदू र संघ शाखा कन्हानचे अध्यक्ष यांनी केले.

सुत्रसंचालन संघाचे महासचिव धर्म दास भिवगडे यांनी तर आभार प्रदर्शन नटवर खोब्रागडे यांनी केले. नगरपरिषद कन्हान-पिपरीचे सर्व सदस्य आणि १० वर्षापासुन कार्यरत असलेले रोजंदारी कर्मचारी सभेला हजर होते. यावेळी अध्यक्ष – श्री. मोहनसिंग यादव, उपाध्य क्ष- श्री. नटवर खोब्रागडे, उपाध्यक्ष – श्री. प्रितम सोमकुंवर, महासचिव- श्री. धर्म दासजी भिवगडे, सचिव- श्री. देविलाल ठाकूर, सहसचिव – श्री. नेहाल बढेल, कोषाध्यक्ष – श्री. रवि वासे, सल्लागार – श्री. धर्मदेव विश्वकर्मा, श्री. लंकेश महा तो, श्री.अंबादास खंडाते, महेश बढेल ,उमेश कठाणे, राजेश महातो, अनिल यादव, रेखा मंडाईत, माला गौतम,गोपाल नान्हे, सुधीर मेश्राम, सुभाष ठवकर, प्रमो द समुद्रे, बंटी खिचर, आशिष समुद्रे कार्य कारणी घोषित करून स्वतंत्र मजदुर युनियनची स्थापना करण्यात आली व पदाधिकाऱ्यांचे मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.