Published On : Mon, Dec 23rd, 2019

सात उमेदवारांनी केले आठ नामनिर्देशनपत्र दाखल

मनपा पोटनिवडणूक प्रभाग क्रमांक १२ (ड) : ९ जानेवारीला निवडणूक

नागपूर: नागपूर महानगरपालिकेतील रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पोटनिवडणुकीचे नामनिर्देशनपत्र सादर करण्याची सोमवारी (ता.२३) शेवटची तारीख होती. विहीत कालावधीमध्ये सात उमेदवारांनी आठ नामनिर्देशनपत्र सादर केले आहेत. धरपमेठ झोन अंतर्गत प्रभाग १२ (ड)साठी ९ जानेवारीला निवडणूक होणार आहे.

मनपाच्या धरपमेठ झोन अंतर्गत प्रभाग १२ (ड) येथील नगरसेवक जगदीश ग्वालबंशी यांचे निधन झाले. त्यामुळे सदर जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. निवडणुकीसाठी १६ ते २३ डिसेंबरदरम्यान नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी कालावधी निश्चीत करण्यात आला होता. या कालावधीमध्ये एकूण आठ नामनिर्देशपत्र सादर करण्यात आली आहेत.

पोटनिवडणुकीसाठी अशोक देवराव डोर्लिकर (अपक्ष), विक्रम जगदीश ग्वालबंशी (भारतीय जनता पार्टी), आकाश सुरेश कावळे (आम आदमी पार्टी), पंकज सुरेंद्र शुक्ला (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), रिजवान नसीर खान (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), प्रफुल देवराव गणवीर (भारिप बहुजन महासंघ), युगलकिशोर केसरलालजी विदावत (अपक्ष) यांनी नामनिर्देशनपत्र सादर केले.

भारतीय जनता पार्टीद्वारे विक्रम जगदीश ग्वालबंशी यांनी दोन नामनिर्देशनपत्र सादर केले आहे. सर्व उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी मनपा उपायुक्त निर्भय जैन यांच्याकडे नामनिर्देशनपत्र सादर केले. मंगळवारी (ता.२४) नामनिर्देशनपत्रांची छाननी केली केली जाणार आहे.


निवडणूक वेळापत्रक

नामनिर्देशन पत्र छाननी – २४ डिसेंबर २०१९

वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध – २४ डिसेंबर २०१९

उमेदवारी अर्ज मागे घेणे – २६ डिसेंबर २०१९

उमेदवारांना निवडणूक चिन्ह नेमून देणे – २७ डिसेंबर २०१९

निवडणूक लढविणा-या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध – २७ डिसेंबर २०१९

मतदान दिनांक – ९ जानेवारी २०२०

मतमोजणी व निकाल जाहीर – १० जानेवारी २०२०