Published On : Mon, Dec 23rd, 2019

बीकेसीपी शाळेत क्रिडा स्पर्धा व्दारे वार्षिक क्रिडादिवस थाटात साजरा

Advertisement

कन्हान : – बीकेसीपी शाळा कन्हान येथे विविध वैयक्तीक व सांघीक क्रिडा स्पर्धा चे आयोजित करून वार्षिक क्रिडादिवस थाटात साजरा करण्यात आला.

नुकतेच बीकेसीपी शाळा कन्हान येथे इयत्ता ५ ते १० वी विद्यार्थ्यांच्या विविध वैयक्तीक व सांघीक क्रिडा स्पर्धा प्रमुख अतिथी पोरवाल कॉलेज कामठीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. रामटेक, शाळा संचालक समितीचे मा. अशोक भाटिया, मुख्याध्यापिका कविता नाथ मँडम, प्रायमरी मुख्याध्यापिका श्रीमती राव मँडम आदींच्या उपस्थित पथ संचालनाने सुरूवात करण्यात आली.

सामुहिक कवायत, इयत्ता ५ ते ८ च्या विद्यार्थ्यांनी नुत्य कवायतीचे सुंदर प्रदर्शन केले. तदनंतर विविध क्रिडा स्पर्धा घेण्यात आल्या असुन विजेता स्पर्धकांना मान्यव रांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्या त आले.

शाळेच्या इयत्ता १० वी ची विद्यार्थींनी कु सानिका मंगर ची राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत व इयत्ता ९ वी चा सम्यक बोरकर यांची जिल्हा स्तरावर निवड झाल्याबद्दल दोन्ही खेडाळु विद्यार्थ्यांचा विशेष पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. प्रमुख अतिथी डॉ रामटेके हयानी खेळा व्दारे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास यावर मौलिक मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका कविता नाथ मँडम हयानी आभार प्रदर्शन करून राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या उपस्थितीत क्रिडादिवस यशस्विरित्या थाटात साजरा करण्यात आला.