कन्हान : – खंडाळा येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीच्या ७/१२ वर ओमप्रकाश ऐवजी प्रकाश नावाच्या दुरूस्ती करिता तहसिलदार पारशिवनी कडे अर्ज सादर केला. काही दिवसानी नावाच्या दुरुस्तीचे राजपत्र आणण्यात सांगितले. राजपत्र नेऊन दिल्यावर चार महिन्याचा काळ लोटुन सुध्दा तहसिलदार व प्रस्तुतकार हयानी आर्थिक व्यवहार च्या उद्देशाने टाळाटाळीचे उत्तर देत असुन शेतकऱ्या ला मानसिक व आर्थिक त्रास देत असल्याने या प्रकरणी दोषीवर कार्यवाही करण्याची मागणी रिपब्लिकन भिमशक्ती प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे हयानी शेतकऱ्याच्या वतीने केली आहे.
श्री प्रकाश दाजीराव नाईक यांची शेतजमीन मौजा खंडाळा तलाठी ह. न . २१ सर्वे नं २९५ आहे. व त्यांच्या ७/१२ वर ओमप्रकाश दाजीराव असे नावाचा उल्लेख आहे, पण वास्तविक पूर्ण कागदपत्री प्रकाश दाजीराव नाईक या नावाचा उल्लेख आहे. करिता तहसीलदार पारशिवनी यांना ७/१२ रिकॉर्ड वर नावाच्या दुरूस्ती करिता दि ६/३/२९१९ ला तहसील कार्यलय पारशिवनी येथे अर्ज सादर केला होता. त्यावर तहसीलदार महोदयांनी पटवारी व मंडळ अधिका-याना रीतसर अहवाल मागितला होता. तेव्हा पटवारी व मंडळ अधिकारी हयानी रितसर कागदोपत्री अहवाल सादर केला.
परंतु तहसिलदार महोदय व प्रस्तुतकार १ नामे उंदीरवाडे यांनी त्रास देत नाव दुरुस्तीचे राजपत्र आणण्यास सांगितले. तेव्हा दुरुस्ती राजपत्रात प्रकाश दाजीराव नाईक करून आणुन राजपत्र प्रस्तुतकार १ उंदिरवाडे यांना दिले. तरीही चार महिने लोटुन गेल्यावरही तहसीलदार पारशिवनी व प्रस्तुतकार १ उंदिरवाडे प्रकाश दाजीराव नाईक यांना टाळा टाळीचे उत्तर देत असल्याने या मागील उद्देश प्रकाश दाजीराव नाईक यांना असे वाटते की तहसीलदार पारशिवणी व प्रस्तुतकार १ उंदिरवाडे आर्थिक स्वरूपाच्या लेनदेन करिता त्रास देत आहेत. यास्तव प्रकाश दाजीराव नाईक यांनी २/८/२०१९ ला एक अर्ज तहसीलदार कार्यलाय पारशिवनी येथे अर्ज दाखल करून मी ७/१२ मध्ये नावाच्या दुरुस्ती (फेरफार) करीता वारंवार तहसिल कार्यलयाचे चक्रा पाच महिन्या पासून मारीत आहे. ज्यामुळे मला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सदर कामाकरिता मी येणे जाणे करीत असतांना माझे अपघात व इतर अडचण निर्माण झाल्यास प्रस्तुतकार १ नामे उंदिरवाडे व तहसिलदार पारशिवनी हे जवाबदार राहतील.
महाराष्ट्र शासनाने राजपत्राच्या संदर्भात जी आर क्र रा.भु.अ. आ.का./७९/कावी/.स.रा/२०१८ नमूद केला आहे की या प्रक्रिये मध्ये तहसीलदार यांनी राजपत्राने नावात बद्दल करण्यास मान्यता देऊन आदेश निर्गमित केल्या शिवाय इ फेरफार प्रणालीतून तलाठ्या ला फेरफार घेता येणार नाही त्यामुळे तालुका स्थरावर या प्रक्रियेला विलंब होणार नाही याची दक्षता तहसीलदार यांनी घ्यावी असे नमूद आहे. तरीपण चार महिने लोटुनही तहसीलदार पारशिवनी महोदय व प्रस्तुतकार १ उंदिरवाडे हे आर्थिक स्वरूपाच्या लेनदेणा करिता मानसिक त्रास देत आहे. महाराष्ट्र शासनाच्या जी आराची सर्रास पायमल्ली केली जात आहे. तालुक्यातील नागरिक व शेतकरी या अधिकाऱ्या पासून त्रासले असल्याने भ्रष्ट अधिकाऱ्यावर व कर्मचारी यांच्या वर तात्काळ भ्रष्टाचार अधिनियमानुसार रीतसर गुन्हा दाखल करून जिल्हाधि काऱ्या मार्फत विभागीय चौकशी करण्यात यावी व चलअचल संपत्ती जप्त करण्यात यावी आणि त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मांगणी रिपब्लिकन भीमशक्तीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चांद्रशेखर भीमटे यांनी सन्मानीय महाराष्ट्रचे मुख्यमंत्री, नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी रामटेक हयाना निवेदन देऊन केली आहे.