Published On : Mon, Nov 6th, 2017

जिल्हा लोकशाही दिनातील तक्रारींचा तात्काळ निपटारा करा – सचिन कुर्वे

Lokshahi Din
नागपूर: जिल्हा लोकशाही दिनात दाखल होणाऱ्या प्रत्येक तक्रारींची दखल घेवून तक्रारदाराला त्याच्या तक्रारी संदर्भात केलेल्या कार्यवाहीबद्दल सर्व विभाग प्रमुखांनी तात्काळ माहिती उपलब्ध करुन द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केली आहे.

जिल्हा लोकशाही दिनात जिल्हयातील नागरिकांकडून 10 तक्रारी दाखल झाल्या आहेत. लोकशाही दिनात निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के. राव, व उपजिल्हाधिकारी रंव्रिद खजांजी यांनी तक्रारी स्वीकारल्या तसेच तक्रारदारांचे गाऱ्हाणी ऐकून घेतले. यावेळी भूमिअभिलेख विभागाचे श्री. मोरे, उपस्थित होते.

जिल्हा लोकशाही दिनात विभागांकडे प्रलंबित असलेल्या तक्रारींचाही यावेळी आढावा घेण्यात आला. लोकशाही दिनात तक्रार दाखल झाल्यानंतर या तक्रारींची दखल घेवून सखोल चौकशी करण्यात यावी तसेच तक्रारदाराला त्यांच्या तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीबद्दलही विहीत कालावधीत कळविण्यात यावे. तक्रारदारांचे समाधान होईल यादृष्टीने विभाग प्रमुखांनी तक्रारीसंदर्भात केलेल्या कार्यवाहीबद्दल माहिती द्यावी, असेही यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी यावेळी सांगितले.