Published On : Mon, Nov 6th, 2017

“महामेट्रोचा स्टॉलच ठरला अव्वल”

Advertisement


नागपूर: ४ नोव्हेंबर पासून सुरु झालेल्या ३ दिवसीय ”10 व्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरेन्स व एक्स्पो”चा आज उत्साहात समारोप झाला. समारोपीय कार्यक्रमात महामेट्रोला सर्वोत्तम प्रदर्शकाचे (बेस्ट एक्सहिबिटर- Best Exhibitor) प्रथम पारितोषिक घोषित करण्यात आले. तेलंगणा राज्याचे नगर विकास,माहिती तंत्रज्ञान मंत्री मा के. टी.रामा राव यांच्या कडून महा मेट्रो चे व्यवस्थापकीय संचालक डॉ। ब्रिजेश दीक्षित यांनी बेस्ट एक्सहिबिटर चा पुरस्कार स्वीकारला . यावेळी गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालायचे सचिव श्री डी.एस. मिश्रा, महापालिका प्रशासन व शहरी विकास सचिव नवीन मित्तल, CODATU चे अध्यक्ष डोमिनिक बससेरेओ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

यावेळी मान्यवरांनी महामेट्रोच्या शिस्तबद्ध कार्याचे आणि नियोजनबद्ध कार्यप्रणालीचे तोंडभरून कौतुक केले. संमेलनात दिल्ली मेट्रो, मुंबई मेट्रो, चेन्नई तसेच अहमदाबाद गांधीनगर मेट्रो स्पर्धक म्हनून सामील होते. महामेट्रोच्या प्रस्तुतीकरणाने महामेट्रोच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. या वार्षिक संमेलनाचे पुढले आयोजन २-४ नोव्हेंबर २०१८ ला ‘ग्रीन अर्बन मोबिलिटी’ नावाने नागपूर येथे घेण्यात येणार असल्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली.

पहिल्या दिवशी भारताचे उपराष्ट्रपती एम.वैंकेया नायडू यांच्या हस्ते प्रदर्शनीचे उदघाटन करण्यात आले. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबाद शहरात यंदाच्या या वार्षिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील वेगवेगळ्या भागातील रहदारी पर्यायांबरोबरच विविध भागातील मेट्रो बद्दल प्रदर्शनाद्वारे माहीती दिली गेली. मात्र तीनही दिवस येथे लावण्यात आलेला महा मेट्रोचा स्टाॅल मान्यवरांसोबतच नागरिकांच्याही निरंतर आकर्षणाचा मुख्य केंद्र बनला राहिला. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे ​​व्यवस्थापकीय संचालक मा. डॉ. बृजेश दीक्षित नागपूर मेट्रो आणि पुणे मेट्रो टीमसह पूर्णवेळ उपस्थित होते. या दोन्ही प्रकल्पांमुळे वाहतूक सेवा अद्ययावतीकरण, रहदारीच्या समस्या सोडवणे आणि पर्यावरण सुरक्षेत होणारी प्रगती या विविध पैलुंचे प्रदर्शन व्यक्त करणारी मांडणी हे महा मेट्रोच्या स्टॉलचे वैशिष्ट्य येथे प्रदर्शित करण्यात आले आहे. स्टॉलमध्ये समाविष्ट असलेले 5डी बिम, मेट्रो स्टेशनचे डिझाईन्स, मेट्रोसंवाद, सोशल मीडियाचा विधायक वापर, ऊर्जा बचत, वर्धा रोड येथे दुहेरी पल्ल्याच्या रस्त्यासह आरएएल संरचनासाठीचा ग्रीन उपक्रम. स्टॉलमध्ये इलेक्ट्रिक फीडर सर्व्हिस कारचे प्रदर्शन तसेच फिडर सर्व्हिस बद्दल सखोल माहिती दिली गेली. संपूर्ण दिवस स्टॉलला जगभरातील अनेक मान्यवरांनी आणि तज्ज्ञ मंडळींनी भेट दिली आणि माहेमेट्रोची कार्यप्रणाली पाहून तोंडभरून कौतुक केले.

दुसऱ्या दिवशीच्या सेशनमध्ये महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे ​​व्यवस्थापकीय संचालक मा. डॉ. ब्रिजेश दीक्षित हे इतर मान्यवरांबरोबर मुख्य वक्ते म्हणून व्यासपीठावर विराजमान होते. नागपूरमेट्रो आणि पुणेमेट्रो बद्दलची वैशिष्ट्ये यावेळी त्यांनी प्रतिपादन केली. यशस्वीपणे कामाचे नियोजन आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय हे प्रस्तावित वेळेच्या आधीच कार्य पूर्ण होत असल्याचे गमक असल्याचे यावेळी ते बोलत होते. ३ दिवसीय प्रदर्शनीत पहिले पारितोषिक मिळाल्याने महामेट्रोच्या चमूत अत्यंत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.