Published On : Mon, Nov 6th, 2017

आधार नोंदणी अपडेटसाठी बीएसएनएलच्या कार्यालयात तसेच बँकात सुविधा उपलब्ध – सचिन कुर्वे


नागपूर: आधार नोंदणी अपडेट करण्यासाठी जिल्हयातील बँकात तसेच बीएसएनएलच्या कार्यालयात आधार अपडेट सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. आधार अपडेट उपलब्ध असलेल्या बँकांची यादी वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.

जिल्हयातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना आधार नोंदणी अपडेट करण्याची सुविधा जिल्हयातील बीएसएनएलच्या आठही कार्यालयात उपलब्ध आहे. यामध्ये सीटीओ कॅपाऊंड, खामला, नारी, काटोल रोड, इतवारी, व्हीआरसीई, सक्करदरा तसेच झिरो माईल येथील टेलिफोन ऑफिसमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

त्यासोबतच बँकांमध्ये ही सेवा उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी https://appointments.uidai.gov.in या वेबसाईटवर जावून राज्य महाराष्ट्र व जिल्हा नागपूर टाकून उपलब्ध असलेल्या वेरिफिकेशन टाकावा व सर्च ऑप्शनला क्लिक करुन जिल्हयातील उपलब्ध असलेल्या आधार नोंदणी अपडेट केंद्राची यादी उपलब्ध करुन घ्यावी व त्यानुसार आधार अपडेट करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.