Published On : Thu, May 20th, 2021

दिव्यांगांसाठी वेगळे लसीकरण केन्द्र : महापौर

Advertisement

– मनपा – सी.आर.सी.चा संयुक्त उपक्रम

नागपूर : नागपूर महानगरपालिका तर्फे लवकरच दिव्यांगांसाठी लसीकरणाची व्यवस्था यशवंत स्टेडियम येथील समेकित क्षेत्रीय कौशल विकास, पुनर्वास व दिव्यांगजन सशक्तीकरण केन्द्र (सी.आर.सी.) येथे केली जाणार आहे.

महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी बुधवारी (१९ मे) रोजी क्रीडा प्रबोधिनी यशवंत स्टेडियम येथे सुरु असलेल्या सी.आर.सी.केन्द्राला भेट देवून लसीकरणासाठी व्यवस्थेची पाहणी केली. त्यांच्या सोबत वरिष्ठ नगरसेवक श्री. सुनील अग्रवाल, समाजकल्याण विभागाचे उपायुक्त श्री. राजेश भगत, वैद्यकीय आरोग्य अधीकारी डॉ.संजय चिलकर तसेच सी.आर.सी चे केन्द्र संचालक श्री. प्रफुल्ल शिंदे उपस्थित होते. २१ प्रकारचा दिव्यांगाना केन्द्राचा लसीकरणासाठी लाभ मिळू शकतो.

मनपा तर्फे नागरिकांसाठी ड्राइव-इन व्हेक्सीनेशन सध्या ग्लोकल स्केवअर माल आणि वी.आर. नागपूर माल येथे सुरु करण्यात आली आहे. महापौरांना दिव्यांगाकडून सतत विचारणा होत होती की त्यांच्यासाठी मनपा तर्फे वेगळी व्यवस्था करायला पाहिजे. त्यांच्या मागणीला अनुसरुन महापौरांनी मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांच्याशी चर्चा करुन दिव्यांगासाठी वेगळी यंत्रणा उभारण्याची सूचना केली.

महापौरांनी सांगितले की मनपा लसीकरणासाठी योग्य व्यवस्था करुन लवकरात-लवकर दिव्यांगासाठी वेगळा केन्द्र सुरु करेल. महापौरांनी येथे सुरु असलेल्या प्रकल्पांची माहिती श्री. शिंदे यांनी दिली. त्यांनी सांगितले की लसीकरणसाठी येणा-या कर्ण बाधित नागरिकांना सांकेतिक भाषेच्या माध्यमाने त्यांना माहिती दिली जाईल. नेत्रहीन नागरिकांसाठी सुध्दा निरीक्षक उपलब्ध आहे जे त्यांना मदत करतील. येथे येणा-या दिव्यांगासाठी रॅम्प आणि व्हील चेयर ची व्यवस्था सुध्दा करण्यात आली आहे. तसेच त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी समुपदेशन करुन त्यांना स्वयंरोजगार बद्दलची माहिती उपलब्ध केली जाईल.

श्री. शिंदे यांनी सांगितले की केन्द्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयच्या अंतर्गत हे केन्द्र कार्यरत आहे. अलियावरजंग नॅशनल इंस्टीटयूट फार स्पीच एंड हियरिंग डिसेबलिटीचा हा उपक्रम आहे.

यावेळी डॉ.पूर्ति विठठल प्रकाश, जगन मुदगळे, अश्विनी दाहट, निर्मल दास, कविता घोडमारे, गणेश सरोदे उपस्थित होते.