Published On : Thu, May 20th, 2021

खाजगी रुग्णालयाचे नियमबाहय बिलाचे तक्रारीबाबत समितीचा कक्ष स्थापित

नागपूर : खाजगी रुग्णालयांतर्फे कोरोना बाधित रुग्णांचे उपचार करतांना शासनाने ‍निश्चित केलेल्या विहीत दरापेक्षा जास्त दर आकारण्यात येत असलेल्या तक्रारीचे तातडीने निराकरण करण्यासाठी गठित समिती चा कक्ष नागपूर महानगरपालिकेच्या छत्रपति शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळयावर स्थित सामान्य प्रशासन विभाग येथे उघडण्यात आले आहे.

मनपा तर्फे यासाठी विशेष कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली आहे. ज्या रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईकांना बिला संदर्भात तक्रार करायची असेल अशा नागरिकांनी या कार्यालयामध्ये लेखी तक्रार करावी सोबतच खाजगी रुग्णालयाचे बिल, रुग्णाचे केस पेपर जोडावे आणि संपर्क क्रमांक नमूद करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. समिती तक्रार प्राप्त झाल्यानंतर तीन दिवसाच्या आत बिलाची तपासणी करुन आपले अभिप्राय आयुक्तांकडे सादर करेल.

समितीमध्ये डॉ.निसवाडे (सेवानिवृत्त अधिष्ठाता) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर, डॉ.मिलिंद भुरसुंडी, सेवानिवृत्त virologist, डॉ. शेलगावकर, Anesthetist, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर, डॉ. हर्षा मेश्राम, वैद्यकीय अधिकारी, म.न.पा.नागपूर, श्री. संजय वेनोरकर, सहायक लेखाधिकारी, महालेखाकार, लेखापरीक्षा कार्यालय, नागपूर, श्री. संजय मटलानी, सहायक लेखाधिकारी, उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क कार्या. नागपूर, श्री. प्रशांत गावंडे, सहायक लेखाधिकारी, सहसंचालक लेखा व कोषागार, नागपूर, श्री. निर्भय जैन, उपायुक्त (सा.प्र.वि.) महानगरपालिका, नागपूर, श्री. महेश धामेचा, सहा.आयुक्त (साप्रवि) म.न.पा.नागपूर यांचा समावेश आहे.