Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Mar 28th, 2020

  मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19 या नावाने स्वतंत्र बँक खाते

  या खात्यात मदत जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन


  मुंबई : कोविड विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करत आहेत, करू इच्छित आहेत. केवळ याच प्रयोजनार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.

  सढळ हाताने मदत करा
  उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19 या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

  खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

  Chief Minister’s Relief Fund-COVID 19

  Savings Bank Account number 39239591720

  State Bank of India,

  Mumbai Main Branch,
  Fort Mumbai 400023
  Branch Code 00300
  IFSC CODE- SBIN0000300

  मराठीत-
  मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
  बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
  स्टेट बँक ऑफ इंडिया,
  मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
  शाखा कोड 00300
  आयएफएससी कोड SBIN0000300

  सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145