Published On : Sat, Mar 28th, 2020

जीवनावश्यक वस्तू च्या किमती नियंत्रणात ठेवा पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

Advertisement

नागपूर : संचारबंदीच्या काळात गरीब व गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सुलभ पणे मिळतील, तसेच अत्यावश्यक वस्तूच्या किमती वाढणार नाही, काळाबाजर होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश पालकमंत्री डा नितीन राऊत यांनी आज प्रशासनाला दिलेत,

पालकमंत्र्यांनी आज माननीय मुख्यमंत्री यांना जिल्ह्यातील सध्यस्थितीबाबत माहिती दिली. तसेच विभागीय आयुक्त डा संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिकाआयुक्त तुकाराम मुंढे मेयो व मेडिकल चे अधिष्ठाता याचे ओबत उपाययोजनांचा आढावा घेतला. हातावर आणून पानावर खाणाऱ्या गोर-गरीब-निराधार, झोपडपट्टीतील नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंचे वितरण लवकरात लवकर सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तू व सेवा सुरुळीतपणे सुरु आहेत. मात्र, या कठीण काळात कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंचे जसे किराणा,धान्य, भाजीपाला यांची भाव वाढ होऊ नये, जनतेला रास्त दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होईल यादृष्टीने संबंधित व्यापारी-दुकानदारांना तात्काळ सूचना द्याव्यात अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिलेत

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी जिल्हा प्रशासनाचे युद्धस्तरीय काम सुरु आहे. नागपुरात पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आता चार वरून अकरा पर्यंत वाढली आहे. या पार्श्वभूमीवर येणारे दहा दिवस अतिशय महत्वाचे आहेत तसेच निर्णायक राहणार आहेत. त्यामुळे जनतेने अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी घरीच राहावे, शांतता बाळगावी, संयम ठेवावा, अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टंस) चे पालन करावे असे पालकमंत्र्यांनीचआवाहन केले आहे.

जमावबंदो संदर्भातील पोलीस व प्रशासनाच्या सूचनांचे नियमित पालन आणि सहकार्य करीत आहे ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. मात्र, काही लोक अद्यापही प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून “मला काही होत नाही” या आविर्भावात विनाकारण रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पोलीस विभागाने अधिक कडक बंदोबस्त करावा अश्या सूचना आज पालकमंत्री यांनी पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकयांना दिल्या आहेत. जनतेने अश्या या कठीण परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करावे, घरीच राहावे असे आवाहन पालकमंत्री डा नितीन राऊत यांनी केले आहे. रुग्णांची संख्या आता चार वरून अकरा पर्यंत वाढली आहे. या पार्श्वभूमीवर येणारे दहा दिवस अतिशय महत्वाचे आहेत तसेच निर्णायक राहणार आहेत. त्यामुळे जनतेने अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी घरीच राहावे, शांतता बाळगावी, संयम ठेवावा, अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टंस) चे पालन करावे असे पालकमंत्र्यांनीचआवाहन केले आहे.

जमावबंदो संदर्भातील पोलीस व प्रशासनाच्या सूचनांचे नियमित पालन आणि सहकार्य करीत आहे ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. मात्र, काही लोक अद्यापही प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून “मला काही होत नाही” या आविर्भावात विनाकारण रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पोलीस विभागाने अधिक कडक बंदोबस्त करावा अश्या सूचना आज पालकमंत्री यांनी पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिल्या आहेत. जनतेने अश्या या कठीण परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करावे, घरीच राहावे असे आवाहन पालकमंत्री डा नितीन राऊत यांनी केले आहे.