Published On : Sat, Mar 28th, 2020

कॅबिनेट मंत्री केदार यांची प्राथमिक आरोग्य केंद्राला सदिच्छा भेट

टाकळघाट:- महाराष्ट्र राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील छत्रपाल केदार यांनी आज दि २८ मार्च ला सकाळी १० वाजता टाकळघाट प्राथमिक आरोग्य केंद्राला सदिच्छा भेट दिली.

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीवर टाकळघाट प्राथमिक आरोग्य केंद्रावर केल्या जाणारे प्रतिबंधात्मक उपाययोजनाची पाहणी मंत्री महोदयांनी करून सुरक्षिततेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले.यावेळी त्यांच्यासोबत नागपूर जी प अध्यक्ष रश्मी बर्वे,जी प सदस्य गुड्डू बंग,हिंगणा प स उपसभापती सुषमा कावळे,टाकळघाट ग्रा प सरपंच शारदा शिंगारे,उपसरपंच नरेश नरड आदीने सदिच्छा भेटी दिली.

तर यावेळी टाकळघाट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सुचित्रा मनूरकर,दुय्यम वैद्यकीय अधिकारी देबाशीष झा,प्रयोगशाळा तंत्रज्ञ नरेश ताकसांडे व संपूर्ण कर्मचारी उपस्थित होते.