नागपूर : मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळ राऊत, पीसी मनोहर गभणे, पीसी सुधीर कळमकर आणि पीसी नवनाथ डोईफोडे यांना मोठा दिलासा दिला आहे.
पोलीस हवालदार रमणबाबू वालदे यांनी कार्यालयात होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. मृतक हवालदार वालदे हे आणि आरोपी वाहतूक शाखा, भंडारा येथे कार्यरत होते. वालदे यांनी ५ एप्रिल २०१७ रोजी आत्महत्या केली. यानंतर ६ एप्रिल २०१७ रोजी पोलीस स्टेशन भंडारा येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळ राऊत, पीसी मनोहर गभणे, पीसी सुधीर कळमकर आणि पीसी नवनाथ डोईफोडे या पोलीस अधिकार्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. 28 फेब्रुवारी .2020 रोजी त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले.या आरोपपत्राला आरोपी पोलीस अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठात ॲड. समीर सोनवणे यांच्याकडे एफआयआर आणि आरोपपत्र रद्द करण्याची प्रार्थना केली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत निकाल दिला त्यामुळे चार पोलीस अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
या प्रकरणी उच्च न्यायालयाने निरीक्षण केले की, आयजी तपासणीमध्ये मृत व्यक्तीच्या काही त्रुटी लक्षात आल्या होत्या ज्यामुळे तो मानसिक तणाव आणि दबावाखाली होता. हे ठळकपणे दिसून येते की मृत व्यक्तीला अधिकृत काम करताना अस्वस्थ वाटत होते. तो तपासणी अहवालाच्या गुठळ्याखाली होता. ॲड. समीर सोनवणे, ॲड. शिबा ठाकूर, ॲड. अमित ठाकूर आणि ॲड. आक़ुद मिर्झा यांनी चारही पोलीस अधिकाऱ्यांची न्यायालयात बाजू मांडली.