
कामठी : – ,काँग्रेसचे वरिष्ठ नेता पश्चिम महाराष्ट्रातील आमदार भाई जगताप यांनी कामठीतील रेल्वे स्टॅशन मार्गावरील बाबा अब्दुल्ला शहा बाबा दर्ग्यात जाऊन समाधीला चादर चढवून आराधना केली
आमदार भाई जगताप यांचे अब्दुल्ला शहा दर्ग्यात भेटीदरम्यान नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव व अब्दुल्ला शहा दर्गा बाबा कमिटीचे अध्यक्ष मो आबीद भाई ताजी यांनी आमदार भाई जगताप यांचे स्वागत केले
यावेळी अब्दुल्लाच्या दर्गा कमिटीचे उपाध्यक्ष सय्यद खालील सय्यद इस्माईल ,सौकत अली ,अब्दुल मोमीन शाईन, राजकुमार गेडाम , विशाल वाघमारे, राजेश शाहू ,सलीम खान, अब्दुल सलाम ,लक्ष्मण संगेवार प्रमोद खोब्रागडे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार भाई जगताप म्हणाले काँग्रेस कार्यकर्त्यांनी समाजातील शेवटच्या नागरिकांच्या विविध समस्या सोडून काँग्रेस पक्ष बळकट करण्याचे आव्हान केले कार्यक्रमाचे संचालन राजकुमार गेडाम यांनी केले व आभार प्रदर्शन आबीद भाई ताजी यांनी मानले
संदीप कांबळे कामठी


