Published On : Mon, Jul 8th, 2019

विविध मागण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निदर्शने

कामठी:-, महसूल कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयासमोर काळ्या फिती लावून शासनाच्या विरोधात निदर्शने केली
महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाच्या वतीने महसूल कर्मचाऱ्यांना मंडळ अधिकारी संवर्गात पदस्थापना करून वरिष्ठ लिपिक ,नायब तहसीलदार पदी पदोन्नती देण्यात यावी, सेवानिवृत्तीचे वेळी ना हरकत प्रमाणपत्राची अट रद्द करावी यासह विविध मागण्यासाठी शासनाकडे अनेकदा निवेदने देऊन शासन त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असून आमच्या मागण्या त्वरित शासनाने मंजूर करण्याच्या मागणीसाठी महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने निदर्शने व आंदोलन करण्याचा निर्धार केला असून आज तहसील कार्यालयासमोर महसूल कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली यावेळी संघटनेचे राजेश काठोके ,अमोल पोळ ,वसुंधरा मानवतकर, वर्षा भुजाडे ,उषा धुर्वे ,बेबीनंदा जोटीग, प्रशांत करवाडे, नितीन टेंभुरने, सचिन जाधव, राजेश तळस, एस,टी इंगळे सह मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते

संदीप कांबळे कामठी