Published On : Sat, Mar 6th, 2021

ज्येष्ठ नागरिकांनी घेतला झोन कार्यालयातील ऑनलाईन नोंदणी व्यवस्थेचा लाभ

Advertisement

नागपूर : कोव्हिड लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींसाठी लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र, ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था नाही अथवा ऑनलाईन नोंदणीमध्ये त्यांना अडचणी येत आहे, अशा ज्येष्ठांसाठी नागपूर महानगरपालिकेच्या सर्व झोन कार्यालयात ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात आली. या व्यवस्थेचा लाभ अनेकांनी घेतला.

लसीकरण केंद्रावर अधिक गर्दी होऊ नये आणि नोंदणीसाठी ज्येष्ठांना खूप वेळ ताटकळत बसावे लागू नये यासाठी मनपाच्या दहाही झोन कार्यालयात लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. नोंदणीच्या आजच्या पहिल्या दिवशी दुपारी १२ वाजतापासून ही व्यवस्था सुरू झाली. यानंतर दररोज सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत ज्येष्ठ नागरिक ते ज्या क्षेत्रात राहतात, त्या क्षेत्राच्या झोन कार्यालयात नोंदणी करू शकतील. ह्या व्यवस्थेमुळे सरळ लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करण्यापासून लस घेण्यापर्यंतच्या प्रक्रियेपर्यंत बराच वेळ ताटकळत बसावे लागणार नाही. झोन कार्यालयात नोंदणी केली की सरळ दिलेल्या तारखेला आणि वेळेत संबंधित केंद्रावर जाता येईल. ही व्यवस्था म्हणजे ज्येष्ठांसाठी उत्तम सुविधा असल्याचे मत नोंदणी करण्यास झोन कार्यालयात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी बोलून दाखविली.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

लक्ष्मीनगर झोनमध्ये सभापती पल्लवी शामकुळे, सहायक आयुक्त गणेश राठोड, धरमपेठ झोनमध्ये सभापती सुनील हिरणवार, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, हनुमाननगर झोनमध्ये सभापती कल्पना कुंभलकर, सहायक आयुक्त सुषमा मांडगे, धंतोली झोनमध्ये सभापती वंदना भगत, सहायक आयुक्त किरण बागडे, नेहरूनगर झोनमध्ये सभापती स्नेहल बिहारे, सहायक आयुक्त हरिश राऊत, गांधीबाग झोनमध्ये सभापती श्रद्धा पाठक, सहायक आयुक्त अशोक पाटील, सतरंजीपुरा झोनमध्ये सभापती अभिरुची राजगिरे, सहायक आयुक्त विजय हुमने, लकडगंज झोनमध्ये सभापती मनिषा अतकरे, सहायक आयुक्त साधना पाटील, आशीनगर झोनमध्ये सभापती वंदना चांदेकर, सहायक आयुक्त गणेश राठोड आणि मंगळवारी झोनमध्ये सभापती प्रमिला मथरानी आणि सहायक आयुक्त हरिश राऊत यांच्या मार्गदर्शनात आणि देखरेखीत ऑनलाईन नोंदणी कक्षाचे कार्य सुरू आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement