Published On : Sat, Jul 6th, 2019

परिवहन समितीसह दहा विशेष समितींच्या सभापती व उपसभापतींची निवड अविरोध

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन समितीसह इतर दहा विशेष समितीच्या सभापती व उपसभापतींची शनिवारी (ता.६) निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी अश्विन मुदगल यांनी विशेष समिती सभापतींच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, निगम सचिव हरीश दुबे उपस्थित होते.

परिवहन समितीसह स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती, विधी व सामान्य प्रशासन विशेष समिती, शिक्षण विशेष समिती, गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी विशेष समिती, क्रीडा विशेष समिती, महिला व बालकल्याण विशेष समिती, जलप्रदाय विशेष समिती, कर आकारणी व कर संकलन विशेष समिती आणि अग्निशमन व विद्युत विशेष समितीच्या सभापती व उपसभापतींची अविरोध निवड करण्यात आली.

Advertisement

परिवहन समितीच्या सभापतीपदी तिस-यांदा जितेंद्र (बंटी) कुकडे यांची निवड करण्यात आली आहे. परिवहन समितीचे सभापती म्हणून जितेंद्र (बंटी) कुकडे यांच्या सूचक नगरसेविका रुपा रॉय होत्या तर नगरसेवक राजेश घोडपागे हे अनुमोदक होते.

Advertisement

स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या सभापतीपदी अभय गोटेकर तर उपसभापतीपदी किशोर वानखेडे यांची निवड करण्यात आली आहे. नगरसेविका सोनाली कडू ह्या अभय गोटेकर यांच्या सूचक व नगरसेविका पल्लवी श्यामकुळे ह्या अनुमोदक होत्या तर किशोर वानखेडे यांच्या सूचक पल्लवी श्यामकुळे व सोनाली कडू अनुमोदक होत्या.

वीरेंद्र कुकरेजा यांची वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीच्या सभापतीपदी तर नागेश सहारे यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे. नगरसेविका विशाखा बांते ह्या वीरेंद्र कुकरेजा यांच्या सूचक व सरिता कावरे ह्या अनुमोदक होत्या तर नागेश सहारे यांच्या सूचक नगरसेविका सरिता कावरे व नगरसेविका विशाखा बांते अनुमोदक होत्या.

विधी व सामान्य प्रशासन विशेष समितीचे सभापती म्हणून धर्मपाल मेश्राम यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर मिनाक्षी तेलगोटे यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे. धर्मपाल मेश्राम यांच्या सूचक नगरसेविका शकुंतला पारवे व नगरसेविका मनिषा धावडे अनुमोदक होत्या तर मिनाक्षी तेलगोटे ह्यांच्या सूचक नगरसेविका मनिषा धावडे व नगरसेविका शकुंतला पारवे अनुमोदक होत्या.

दिलीप दिवे यांना शिक्षण विशेष समिती सभापतीपदी कायम ठेवण्यात आले असून प्रमोद तभाने यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे. दिलीप दिवे यांच्या सूचक नगरसेविका सुषमा चौधरी व नगरसेविका प्रमिला मथरानी अनुमोदक होत्या तर नगरसेविका रिता मुळे या प्रमोद तभाने यांच्या सूचक व सुषमा चौधरी अनुमोदक होत्या.

गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी विशेष समितीच्या सभापतीपदी तारा (लक्ष्मी) यादव तर उपसभापतीपदी उषा पॅलट यांची निवड करण्यात आली आहे. तारा (लक्ष्मी) यादव यांच्या सूचक नगरसेविका भाग्यश्री कानतोडे व अनुमोदक नगरसेविका रूतिका मसराम होत्या तर उषा पॅलट यांच्या सूचक नगरसेविका रूतिका मसराम व अनुमोदक नगरसेविका भाग्यश्री कानतोडे होत्या.

क्रीडा विशेष समितीचे सभापती म्हणून प्रमोद चिखले व उपसभापती म्हणून मनिषा कोठे यांची निवड करण्यात आली आहे. प्रमोद चिखले यांच्या सूचक नगरसेविका सरला नायक व नगरसेवक सुनील हिरणवार अनुमोदक होते तर मनिषा कोठे यांचे सूचक नगरसेवक सुनील हिरणवार व नेहा वाघमारे अनुमोदक होत्या.

संगीता गि-हे यांची महिला व बालकल्याण विशेष समिती सभापतीपदी तर दिव्या धुरडे यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे. संगीता गि-हे यांच्या सूचक नगरसेविका दिव्या धुरडे व नगरसेविका मनिषा अतकरे अनुमोदक होत्या तर दिव्या धुरडे यांच्या सूचक नगरसेविका मंगला खेकरे सूचक व नगरसेविका मनिषा अतकरे अनुमोदक होत्या.

विजय झलके यांना जलप्रदाय विशेष समिती सभापती म्हणून पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. समितीच्या उपसभापतीपदी भगवान मेंढे यांची निवड करण्यात आली आहे. विजय झलके यांचे सूचक नगरसेवक गोपीचंद कुमरे व दिपक चौधरी अनुमोदक होते तर भगवान मेंढे यांचे सूचक दिपक चौधरी व गोपीचंद कुमरे अनुमोदक होते.

कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती म्हणून संदीप जाधव व उपसभापती म्हणून सुनील अग्रवाल यांना कायम ठेवण्यात आले आहे. नगरसेवक महेंद्र धनविजय संदीप जाधव व सुनील अग्रवाल यांचे सूचक तर नगरसेविका उज्ज्वला शर्मा या संदीप जाधव यांच्या तर शिल्पा धोटे या सुनील अग्रवाल यांच्या अनुमोदक होत्या.

अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापतीपदी संजयकुमार कृष्णराव बालपांडे व उपसभापतीपदी निशांत गांधी यांची निवड करण्यात आली आहे. संजयकुमार बालपांडे यांचे सूचक नगरसेविका वंदना भुरे व नगरसेविका भारती बुंडे अनुमोदक होत्या तर निशांत गांधी यांच्या सूचक नगरसेविका भारती बुंडे व नगरसेविका वंदना भुरे अनुमोदक होत्या.

सर्व विजयी उमेदवारांचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, निगम सचिव हरीश दुबे यांनी तुळशीचे रोपटे देऊन स्वागत आणि अभिनंदन केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement