Published On : Sun, Oct 3rd, 2021

रूग्णसेवेसाठी मानव भूमिची निवड

Advertisement

– भदंत ससाई यांचे प्रतिपादन

नागपूर: कोरोनाची तिसरी लाट येवू नये अशी प्रार्थना आहे. मात्र, असे झाल्यास सर्वांनाच आरोग्य सुविधा आणि उपचार मिळावा, यादृष्टीकोणातून कोविड केंद्र तयार करण्यात आले आहे. नागार्जृनाच्या मानवभूमिची (मनसर) रूग्णसेवेसाठी निवड करण्यात आली असून या केंद्राचा सर्वांना लाभ मिळेल, असे प्रतिपादन भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले.

बोधिसत्व नागार्जुन स्मारक संस्था व अनुसंधान केंद्र, समता सैनिक दल आणि समता आरोग्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नागार्जुन विहार, मनसर येथे द नागार्जुन चॅरीटी कोविड केअर केंद्राच्या उद्घाटना प्रसंगी ससाई बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. स्मृति रामटेके तर प्रमुख अतिथी डॉ. कमल गवई, डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रा. जावेद पाशा, अमित गडपायले उपस्थित होते.

आरोग्य सुविधाने सज्ज असलेल्या २० बेडच्या केंद्रात ऑक्सिजनही उपलब्ध असेल. भविष्यात या केंद्राला रूग्णालयाचे रूप देता येईल, या केंद्राचा परिसरातील नागरिकांना लाभ मिळेल असेही ससाई म्हणाले. यावेळी त्यांनी समता सैनिक दलामार्फत होत असलेल्या अभिनव वैद्यकीय सेवेचे कौतुक केले. यावेळी डॉ. स्मृती रामटेके, डॉ. सिध्दार्थ गायकवाड, कमल गवई आणि प्रा. पाशा यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आणि संचालन अ‍ॅड. स्मिता कांबळे यांनी तर आभार विश्वास पाटील यांनी मानले.

कोविड केयर केंद्राचे निर्माण आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. महेंद्र कांबळे, आकाश मुन, संकेत शंभरकर, अरुण भारशंख, राज सुखदेवे, अजय बागडे, टारझन ढवळे, राजेश लांजेवार, आनंद तेलंग, अनिल रामटेके, प्रफुल मेश्राम, सुखदास बागड़े, नंदकिशोर रंगारी, प्रज्वल बागडे, सुलभ बागडे, विनोद बंसोड, सुरेखा शेंभेकर, दिशु कांबळे, विभावरी गजभिये, उषा बौद्ध यांनी सहकार्य केले.