Published On : Wed, Mar 3rd, 2021

म.न.पा.च्या अत्याधुनिक विज्ञान संशोधन केन्द्रासाठी गरोबा मैदान शाळेची निवड

नागपूर : नागपूर महानगरपालिकाचे शाळेत शिकणारे प्रतिभाशाली गरीब विद्यार्थ्यांसाठी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेने व पुढाकाराने गरोबा मैदान येथील मनपा शाळेत अत्याधुनिक, उत्कृष्ट स्तराच्या विज्ञान संशोधन केन्द्राची स्थापना केली जाईल.

महापौर श्री. तिवारी यांच्या कक्षात मनपा शाळेतील गरीब, प्रतिभावंत विद्यार्थ्यांसाठी विज्ञान संशोधन केन्द्राचे स्थापनेबददल चर्चा करण्यात आली. या बैठकीत शिक्षण सभापती श्री. दिलीप दिवे, उपसभापती श्रीमती सुमेधा देशपांडे, सदस्य श्री. नागेश सहारे, वरिष्ठ सदस्य श्री.सुनील अग्रवाल, शिक्षणाधिकारी श्रीमती प्रीति मिश्रीकोटकर व अपूर्व विज्ञान मेला आयोजित करणारे श्री. सुरेश अग्रवाल उपस्थित होते.

महापौरांनी सांगितले की मनपाच्या माध्यमाने दरवर्षी अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. एकदा या मेळाव्याला तत्कालीन शिक्षण सचिव श्री. नंदकुमार यांनी भेट दिली आणि ते ऐवढे प्रभावित झाले की त्यांनी या नागपूरच्या उपक्रमाला राज्यभरात लागू करण्याचे निर्देश काढले होते. मनपाच्या शिक्षकांनी सुध्दा राज्य भरात शिक्षकांना प्रशिक्षण दिले होते. अपूर्व विज्ञान मेळाव्याच्या माध्यमाने सुरेद्रगढ मनपा शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी रामेश्वरम येथून लहान उपग्रह अंतरिक्षात सोडण्याच्या नासाच्या अभियानात भाग घेतला. त्यांच्यामुळे नागपूरला अंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक प्राप्त झाला आहे. त्यांनी शिक्षण समिती सभापतींना मनपाची बंद शाळा शोधण्याची जबाबदारी दिली जिथे विज्ञान संशोधन केन्द्राची स्थापना केली जाऊ शकते. महापौरांचा निर्देशाप्रमाणे श्री. दिलीप दिवे व श्री. सुरेश अग्रवाल यांनी गरोबा मैदान येथील शाळेची निवड केली.

श्री. तिवारी यांनी सांगितले की केन्द्रीय भुपृष्ठ, परिवहन मंत्री श्री.नितिन गडकरी यांनी राष्ट्रीय स्तराचे विज्ञान संशोधन केन्द्र नागपूरात उघडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याच अनुषंगाने मनपाने मनपाच्या होतकरु प्रतिभावंत विद्यार्थ्यांसाठी विज्ञान संशोधन केन्द्राची स्थापना केली जाणार आहे. विज्ञानात रुचि असणा-या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. श्री सुरेश अग्रवाल यांनी सांगितले की अपूर्व विज्ञान मेळाव्यासारख्या इथे ही “आओ विज्ञान से दोस्ती करें” च्या धर्तीवर विज्ञानाचे शिक्षण दिले जाईल. तसेच शिक्षकांना सुध्दा प्रशिक्षण दिल्या जाईल.