Published On : Fri, Oct 13th, 2017

नसीब उके याची राज्य स्तरावर कुस्ती मध्ये निवड

कन्हान : क्रीडा संकुल नागपूर येथे झालेल्या विभागीय क्रीडा स्पर्धा कूस्ती मध्ये १७ वर्ष वयोगट व ५४ किलाे वजन गटात गडचिरोली, गोंदीया, वर्धा, चंद्रपूर या चार जिल्हयातील विद्याथ्याशी लढत देत प्रथम क्रंमाकाचे विजेतेपद पटकावले व हाेणा-या राज्यस्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धेसाठी नागपूर विभागातून निवड झाली.

क्रीडा शिक्षक हरित केवटे, विजय पारधी, मार्गदर्शक, सांरग चकाेले, यांनी त्याचे अभिनंदन केले .तसेच शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर झोड ,उपमुख्या़ध्यापिका सौ. स्वाती झाेड, पर्यवेक्षीका सौ. पमीता वासनिक, अनिल सारवे, सुनिल लाडेकर, नरेन्द कडवे,खिमेश बढिये, अनिल मंगर, प्रकाश मेश्राम यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरीता त्याला शुभेच्या दिल्या