Published On : Thu, Aug 29th, 2019

कोराडी नवरात्रोत्सवात सुरक्षा व स्वच्छतेला प्राधान्य : पालकमंत्री बावनकुळे

Advertisement

10 लाख भाविकांची राहणार उपस्थिती परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लागणार विकास कामे अंतिम टप्प्यात

नागपूर: कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान येथे नवरात्रोत्सवाचे आयोजन मोठ्या प्रमाणात दरवर्षी करण्यात येत असते. मध्य भारतातून देवीच्या दर्शनासाठी सुमारे 10 लाखांवर भाविक येथे दर्शनासाठी येतात. या दरम्यान यात्रेत आवश्यक त्या सुविधा व सुरक्षा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध शासकीय यंत्रणांनी आपापल्या समन्वयाने येत्या 10 दिवसात सर्व कामे पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कोराडी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या कामांचा आढावा आज पालकमंत्री बावनकुळे यांनी घेतला. त्यावेळी बे बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश शर्मा, उपाध्यक्ष अजय विजयवर्गी, सचिव केशवराव फुलझेले, श्रीमती सुशीला मंत्री, प्रेमलाल पटेल, कोषाध्यक्ष बाबुराव भोयर, विश्वस्त अ‍ॅड. जी. डी. चन्ने, नंदूबाबू बजाज, स्वामी निर्मलानंदजी महाराज, प्रभा निमोने, दयाराम तडसकर, अशोकबाबू खानोरकर, दत्तू समरितकर, डॉ श्रीमती नंदिनी त्रिपाठी, पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोराडी येथे नवरात्रोत्सवाची सुरुवात 29 सप्टेंबरपासून होत असून श्री महालक्ष्मी जगदंबा देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक उपस्थित राहतात. या निमित्त नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यासाठी मंदिर परिसरात विकासासाठी शासनाने विशेष आराखडा मंजूर केला असून त्यानुसार सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत. नवरात्रोत्सवासाठी येणार्‍या भाविकांची गैरसोय होणार नाही, तसेच सुलभपणे दर्शन घेता यावे, यासाठी संस्थानतर्फे आवश्यक उपाययोजना पूर्ण केल्या आहेत. विकास आराखड्यातील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री बावनकुळे यांनी दिल्या आहेत.

भक्तनिवासची अद्ययावत इमारत पूर्ण झाली आहे. तसेच भाविकांसाठी बस थांबा, देवी मंदिराचा मुख्य गाभारा, सभा मंडप आदींचे काम पूर्ण झाले आहे. पार्किगची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, रस्त्यांची व्यवस्था येत्या 10 दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. या संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी 60 कर्मचारी दोन पाळ्यांमध्ये काम करतील. कचरा कुंड्यांची व्यवस्था तसेच शौचालयांची व्यवस्था योग्य दृष्टीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिस विभागाच्या मार्गदर्शनाखाली वाहनव्यवस्था व पार्किगची व्यवस्था करण्यात यावी. भाविकांसाठी मदत केंद्र, पोलिस चौक सुरु करण्याची सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिली.

भाविकांना दर्शनासाठी तीन प्रवेशद्वार राहणार आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील या परिसरात महानिर्मितीतर्फे पथदिवे, पाच हजार हायमास्ट टॉवर बसविण्यात येतील. तसेच 24 तास आरोग्य पथक व अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था राहील. पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध केले जाईल. कोराडी ग्रामपंचायत, महानगर पालिका, श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, महसूल विभाग, पोलिस विभाग यांच्या समन्वयाने सर्व कामे वेळेपूर्वी पूर्ण करण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.

Advertisement
Advertisement