Published On : Thu, Aug 29th, 2019

मिहान प्रकल्पग्रस्तांकडून पालकमंत्र्यांचे विमानतळावर जोरदार स्वागत

नागपूर: मिहानमधील पुनवर्सन, भूसंपादन आणि विकास कामांसाठी 992 कोटी वाढीव खर्चास शासनाची मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न करून निधीची व्यवस्था केल्याबद्दल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आज विमानतळावर मिहान प्रकल्पग्रस्तांनी पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत केले.

पालकमंत्री आज सकाळी मुंबईहून नागपुरात आले. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांनी तेथे त्यांना भेटण्यास गर्दी केली. यावेळी विमानतळावर पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठ़ी माजी जि.प. सदस्य रुपराव शिंगणे, रेखा मसराम, केशव सोनटक्के, प्रमोद डेहनकर, दिलीप पायघन, शंकर बारई, विनायक बारई, शेखर उपरे, विजय झाडे, लक्ष्मण रोकडे, आशिष खळतकर, आशिष दुरुकर, बापूराव महाकाळकर, लक्ष्मण बारई, विनायक लढी, पुरुषोत्तम सोनटक्के, शांताबाई मून, मीराबाई सोनटक्के, घनश्याम मस्के, गणेश सोनटक्के, सचिन वानखेडे, सचिन तिवाडे, परसराम डेहनकर, सुभाष डेहनकर, विनोद ठाकरे, रोशन आंबटकर, रामदास सोनुर्ले, अरुण मिसाळ, सुजित हिंगणे, महेश सोनटक्के, सुधीर जोशी, ताराबाई झाडे, अर्चना पायघन, लता बारई, कमला मोहर्ले, सुनील झाडे, खुशाल सोनटक्के, शेषराव सोनटक्के, प्रक़ाश वागे व मोठ़्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.