नागपूर : नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाने विनादाव्याचे (Unclaimed) वाहनांचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. वाहतूक परिमंडळ सोनेगाव व इंदोरा येथे अनेक वर्षांपासून पडून असलेल्या एकूण 220 दुचाकी वाहनांचा स्क्रॅप लिलाव करण्यात येणार आहे. यामध्ये सोनेगाव विभागातील 48 तर इंदोरा विभागातील 172 दुचाकींचा समावेश आहे.
ही कारवाई महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 18 जून 1991 रोजीच्या परिपत्रकातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार केली जात आहे. संबंधित वाहनांची यादी नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या अधिकृत वेबसाईटवर [https://nagpurpolice.gov.in/Press Release.html](https://nagpurpolice.gov.in/Press Release.html) येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
वाहन खरेदीस इच्छुक नागरीकांना आणि संबंधित व्यावसायिकांना ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इच्छुकांनी सात दिवसांच्या आत, म्हणजेच 28 जुलै 2025 पासून पुढील 7 दिवसांत, पोलीस निरीक्षक, वाहतूक परिमंडळ सोनेगाव व इंदोरा यांच्याकडे तीन प्रतींमध्ये बंद लिफाफ्यात निविदा सादर कराव्यात, असे जाहीर करण्यात आले आहे.
प्राप्त निविदांची छाननी विशेष समितीद्वारे करण्यात येणार असून, पात्र निविदाकर्त्यांना वाहने स्क्रॅप स्वरूपात विक्रीसाठी देण्यात येतील,अशी माहिती नागपूर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त लोहित मतानी यांनी दिली.