Published On : Fri, Jul 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात शाळेच्या व्हॅनला ‘आपली बस’ची जोरदार धडक; 3 ते 4 विद्यार्थी जखमी

Advertisement

नागपूर : शहरातील पंचशील चौक येथे शुक्रवारी सकाळी शाळेची व्हॅन आणि महापालिकेची ‘आपली बस’ यांच्यात भीषण अपघात झाला. या धडकेत शाळेच्या व्हॅनमधील 3 ते 4 विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झालेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 7 ते 7.15 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला. पत्रकार भवन परिसरातून कॅनॉल रोडच्या दिशेने जात असलेल्या शाळेच्या व्हॅनला महापालिकेच्या ‘आपली बस’ने बाजूने जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की शाळेच्या व्हॅनचा पुढील भाग मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. अपघातावेळी व्हॅनमधील काही विद्यार्थी जागेवरून खाली पडल्याने त्यांना दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात हलविले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण काय, चालकाचा निष्काळजीपणा होता की अन्य काही कारण, याचा तपास सुरू आहे.

Advertisement

या घटनेमुळे सकाळच्या शालेय वेळेत पंचशील चौक परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अपघाताबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.