कामठी:-दोन महिन्यांच्या शालेय सुट्ट्यानंतर काल 26 जून पासून शाळेचा पहिला दिवस म्हणून तालुक्यातील समस्त शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला तर शाळेचा पहोला दिवस हा अविस्मरणीय ठरावा म्हणून शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा झाला.
यानुसार कामठी नगर परिषद ची अब्दुल सत्तार फारुकी उर्दू प्राथमिक शाळेत आकर्षक सजावट करण्यात आली होती.तर शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सव दिनानिमित्त शालेय पाठयपुस्तके मोफत वितरित करून गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच मिठाई देऊन विद्यार्थ्यांचे तोंड गोड करण्यात आले.
याप्रसंगी कामठी नगर परिषद चे नवनियुक्त उपाध्यक्ष शाहिदा बेगम अन्सारी, माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , नगरसेविका, शाळेचे मुख्याध्यापक नकीब अखतर तसेच शालेय शिक्षक गण उपस्थित होते.
संदीप कांबळे कामठी
