Published On : Thu, Jun 27th, 2019

पांदण रस्ता योजनेचे कामे लवकरात लवकर प्रस्तावित करा:-एसडीओ वंदना सवरंगपते

कामठी :-यांत्रिकीकरणामुळे शेतामध्ये पेरणी, अंतरमशागत, कापणी, मळणी यासारखी कामे यंत्रांमार्फत करण्यात येतात अशा यंत्र सामग्रीचा वाहतूक करण्याकरता पावसाळ्यातही शेत/पांदण रस्ते सुयोग्य असणे काळाची गरज आहे .या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने 27 फेब्रुवारी 2018 नुसार शासनाने विविध योजनांच्या अभिसरणा मधून शेत/पांदनरस्ते योजना राबविण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे.

यानुसार पालकमंत्री पांदण रस्ता योजने अंतर्गत पावसाळ्यात शेतकऱ्यांना रस्त्या अभावी अडचणी निर्माण न होवो तसेच कामठी तालुक्यातील पांदण रस्ते प्रश्न मार्गी लावण्याच्या उद्देशाने कामठी पंचायत समिती सभागृहात घेण्यात आलेल्या सरपंच , सचिवांच्या मुख्य बैठकीत पांदण रस्ते समस्येविषयीचे अर्ज लवकरात लवकर प्रस्तावित करून विषय मार्गी लावण्याचे आव्हान एसडीओ वंदना सवरंगपते यांनी समस्त सरपंच ग्रामसेवकाना दिले.

याप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यालयीन स्वीय सहाययक शिवराज पडोळे, कुंभारे, तहसिलदार अरविंद हिंगे, पंचायत समितीचे सहाययक गट विकास अधिकारी सुरेश कोल्हे, विस्तार अधिकारो शशिकांत डाखोळे आदी उपस्थित होते. सभेत पालकमंत्री पांदण रस्ते योजना, नाला खोलीकरण, तलाव खोलीकरण यावर विशेष चर्चा करण्यात आली.सभेत ग्रा प सरपंच तसेच ग्रामसेवक गण मोठ्या संख्येत उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी