Published On : Mon, Jul 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड नाही;तुकाराम मुंढेंची शाळांच्या कॅन्टीनवर नजर,राज्यभर तपासणी मोहीम सुरू

Advertisement

मुंबई : राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थांवर धडक कारवाई करून अनेक उत्पादक आणि व्यावसायिकांवर कारवाई करणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आता शाळांमधील कॅन्टीन आणि मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि पौष्टिक आहार मिळावा यासाठी राज्यव्यापी विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या मोहिमेअंतर्गत खासगी शाळांतील कॅन्टीन, मध्यान्ह भोजन पुरवठादार आणि अन्न हाताळणाऱ्या संबंधित संस्थांची सखोल तपासणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा एफडीएने दिला आहे.

Gold Rate
July 13 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,800 /-
Gold 22 KT ₹ 1,32,500 /-
Silver/Kg ₹ 2,19,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या पार्श्वभूमीवर मुंबईत शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि मध्यान्ह भोजन पुरवठादारांची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. बैठकीत अन्नसुरक्षा कायद्याचे काटेकोर पालन, स्वच्छता, अन्नाची गुणवत्ता आणि पौष्टिक आहाराबाबत आवश्यक निर्देश देण्यात आले.

एफडीएचे सहाय्यक आयुक्त पी. आर. सिंगारवाड यांनी अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. गेल्या काही वर्षांत मध्यान्ह भोजनात अळ्या, निकृष्ट दर्जाचे अन्न आणि दूषित पदार्थ आढळल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. अनेक शाळांच्या कॅन्टीनमधील अस्वच्छतेच्याही तक्रारी नोंदवण्यात आल्याने ही मोहीम अधिक कठोर करण्यात आली आहे.

Advertisement

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांपासून ५०० मीटर परिसरात ‘स्टिंग’ या ऊर्जा पेयाच्या विक्रीवर राज्य सरकारने बंदी घातल्यानंतर एफडीएने शालेय परिसरातील अन्नसुरक्षेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

नागरिकांनी भेसळयुक्त अन्न, अस्वच्छता किंवा अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन एफडीएने केले आहे.

रक्तपेढ्यांवरही एफडीएचा मोठा दणका-
दरम्यान, रक्तसुरक्षेचे निकष पाळण्यात गंभीर त्रुटी आढळल्याने राज्यातील १९ रक्तपेढ्यांचे परवाने एफडीएने रद्द केले आहेत. रक्तसंकलन, साठवणूक, वितरण, शीतसाखळी व्यवस्थापन आणि शासकीय नियमांच्या पालनात झालेल्या निष्काळजीपणामुळे मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूरमधील रक्तकेंद्रांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement
नागपुर में रंगदारी का आतंक! बेसबॉल बैट से हमला #NagpurNews #CrimeNews #Extortion #police #viral

नागपुर में रंगदारी का आतंक! बेसबॉल बैट से हमला #NagpurNews #CrimeNews #Extortion...

गाय के साथ अश्लील हरकत करने वाला सिरफिरा गिरफ्तार #NagpurNews #CrimeNews #Mankapur #AnimalCruelty

गाय के साथ अश्लील हरकत करने वाला सिरफिरा गिरफ्तार #NagpurNews #CrimeNews #Mankapur...

राम मंदिर दान राशि मुद्दे पर वर्धा में कांग्रेस का सत्याग्रह #rammandir #Congress #news #political

राम मंदिर दान राशि मुद्दे पर वर्धा में कांग्रेस का सत्याग्रह #rammandir...

बुटीबोरी लूटकांड का 8 दिन में खुलासा #nagpurnews  #Butibori #Crime #LootCase #policeaction #news

बुटीबोरी लूटकांड का 8 दिन में खुलासा #nagpurnews #Butibori #Crime #LootCase #policeaction...

हॉटस्टार अपग्रेड के नाम पर 1.30 लाख की साइबर ठगी...#updatenews #news #nagpurnews #vidarbhanews

हॉटस्टार अपग्रेड के नाम पर 1.30 लाख की साइबर ठगी...#updatenews #news #nagpurnews...

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 13 JULY 2026 #top10 #maharashtranews #updatednews #vidarbhanews #news

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 13 JULY 2026 #top10...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges