Published On : Fri, Jan 3rd, 2020

विधी समितीतर्फे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

नागपूर : स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८९व्या जयंतीनिमित्त विधी व सामान्य प्रशासन समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी अभिवादन केले. मनपा मुख्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून विधी व सामान्य प्रशासन समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी अभिवादन केले.

याप्रसंगी ॲड. राहुल झांबरे, शंकर मेश्राम, रोहन चांदेकर, नितीन वाघमारे आदी उपस्थित होते.