Published On : Fri, Jan 3rd, 2020

अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांची दीक्षाभूमीला भेट

महापौर संदीप जोशी यांनी केले स्वागत

नागपूर : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी नागपूर दौ-यानिमित्त शुक्रवारी (ता.३) दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे दर्शन घेतले व भगवान बुद्धांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महापौर संदीप जोशी यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांचे पुष्पगुच्छ देउन नगरीच्या वतीने स्वागत केले. याप्रसंगी आमदार गिरीश व्यास, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विधी व सामान्य प्रशासन समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम, भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्ष शिवाणी दाणी आदी उपस्थित होते.