
नागपूर: उप राजधानीच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणाऱ्या तसेच 300 वर्ष जुन्या सोनेगाव आमराई येथील भोसलाकालीन विहिरीला नवसंजीवनी तर मिळणारच आहे पण अगदी त्या विहिरी समोर असलेल्या निसर्गरम्य हनुमान मंदिर परिसराला देखील स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा निर्धार आता ह्या भागात नित्यनियमाने मॉर्निंग & इव्हनिंग walk करणाऱ्या नागरिकांनी एक “Save आमराई” ग्रुप निर्माण करून केला आहे.
आज जवळपास 20 तरुण तसेच वरिष्ठ नागरिकांनी एकत्र येत ह्या हनुमान मंदिर आणि भोंसालेकालीन विहीर परिसरातील संपूर्ण परिसर पिंजून काढून जवळपास 10 पोते भरून दारू, बियर, पाणी बॉटल्स , सिगारेट चे पाकिट, कंडोम चे पाकिट तसेच प्लास्टिक पॅकेट्स आणि केक बॉक्सेस जमा केले आणि परिसर झाडून स्वच्छ केला. दर रविवारी सकाळी हा उपक्रम राबविण्याचा निर्धार सर्व नागरिकांनी केला आहे.
हा परिसर निसर्ग रम्य आणि मुख्य रस्त्याच्या बरच दूर असल्याने तरुण मंडळी , कॉलेज विद्यार्थी येथे वाढदिवस किंवा इतर कार्यक्रम साजरे करतात . मात्र कार्यक्रम साजरे करत असताना जो कचरा करतात त्याने ह्य भोन्सलेकालीन विहिरीचेच नाही तर भोन्सलेकालीन आमराई चे देखील प्रचंड नुकसान होत आहे.
असामाजिक तत्व येथे भर दुपारी आणि रात्री येऊन दारू पितात आणि कचरा करून जातात. हाच कचरा दर रविवारी उचलून परिसर नेहमीच स्वछ ठेवायचा असे आता ह्या भागात येणाऱ्या वरिष्ठ तसेच युवा नागरिकांनी ठरविले आहे. मनपा लक्ष्मीनगर झोन च्या कचरा संकलन करण्याऱ्या विभागाचे ह्या कचऱ्याच्जी विल्हेवात् लावण्यासाठी मोलाची मदत मिळणार आहे.
तसेच ह्या परिसराला पुन्हा आंब्याची विविध झाडे लावून आमराईचे गत वैभव परत आणण्याचा प्रयत्न केल्या जाणार आहे.
नुकतीच नागपूर महानगर पालिका स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी ह्यांनी मनपा लक्ष्मीनगर झोन चे अधिकारी सोबत भोन्सलेकालीन विहिरीला भेट दिली आणि हनुमान मंदिर परिसराची देखील पाहणी केली होती. लवकरच हेरिटेज कमिटी च्या अप्रूवल नंतर ही विहीर देखील स्वच्छ होणार आहे.
ह्याच विहिरीचे पाणी ह्या परिसरातील झाडांना आणि नवीन लावलेल्या आंब्याच्या झाडांना टाकण्यासाठी आणि झाडे जिवंत ठवण्यासाठी होणार आहे.
आमराई ग्रुप च्या सर्व वरिष्ठ तसेच युवा नागरिकांची ह्या निसर्गरम्य् भागात येणाऱ्या सर्व तरुणाई, असामाजिक तत्वाना सुद्धा विनंती आहे की त्यांनी एक तर कचरा आणि नये, विहिरीला आणखी दूषित करू नये आणि किंवा आपल्या सोबत कचऱ्याची विल्हेवट लावण्यासाठी काही bag सोबत आणून कचऱ्याची विल्हेवात लावावी.









