Published On : Tue, May 28th, 2019

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त मनपातर्फे अभिवादन

नागपूर महानगरपालिकेव्दारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३६ व्या जयंती निमित्त महापौर नंदा जिचकार व उपमहापौर श्री.दिपराज पार्डीकर यांनी शंकरनगर स्थित सावरकरांच्या पुतळयाला माल्यार्पण करुन अभिवादन केले.

या प्रसंगी नगरसेवक सुनील हिरणवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ.राजाभाऊ शिलेदार, डॉ. कूमार शास्त्री, सावरकर समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे, डॉ. अजय कुळकर्णी, प्रा.प्रमोद सोवनी, शिरीष दामले, मुकुंद पाचखेडे, महादेव बाजीराव, अथर्व जलतारे, संजय व उदय कठाळे, रवींद्र कासखेडीकर, सावरकरांचे वेषभूषेत सर्जेराव गलपट, सहाय्यक जनसंपर्क ‍ अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, राजेश वासनिक तसेच परशुराम ब्राम्हण संघ व हिंदू महासभेचे पदाधिकारी कार्यकर्ता व परिसरातील बहुसंख्य नागरीक प्रामुख्याने उपस्थित होते.