कामठी: कामठी येथील सैनिक प्रशिक्षण केंद्र जीआरसी येथे सुभेदार पदी कार्यरत असलेल्या सैनिकाचा कामठी रेल्वे स्थानकावर छत्तीसगढ एक्प्रेस रेल्वे गाडीतुन खाली पडल्याने अपघाती जख्मि सैनिकाचा जागीच दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना काल 27 मे ला रात्री 9 .40वाजता कामठी रेल्वे प्लॅटफॉर्म क्र 2 वर घडली असून मृतक सैनिक सुभेदार चे नाव गोविंद नारायण कलिहारि वय 52 वर्षे रा जीआरसी क्वार्टर कामठी असे आहे.
प्राप्त माहिती नुसार सदर मृतक सैनिक सुभेदार हे पंजाब येथील आंबला येथे शिक्षण घेत असलेल्या मुलीच्या भेटीला भेट घेण्यासाठी मूलगा विक्की यासह कुटुंबीय सदस्यांना छत्तीसगढ एक्सप्रेसने पाठवन्याचे नियोजित वरून काल 27 मे ला रात्री साडे नऊ वाजता छत्तीसगढ एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्र 2 वर पोहोचताच कुटुंबीय सदस्यांना रेल्वे गाडीत बसवून खाली उतरत असता अचानक सुरु झालेल्या रेल्वेगाडीतून तोल गेल्याने खाली पडून जागीच मृत्यू झाला या घटनेने मृतक सुभेदार च्या कुटुंबीय सदस्यांना एकच धक्का बसला.घटना घडताच रेल्वे पोलिसांनी त्वरित घटनास्थळा चा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणी साठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलवून मृतकाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात आले.पोलिसांनीब्या संदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली .
मृतक सुभेदार हे मूळचे छत्तीसगढ येथील रहिवासी असून सहावमहिन्यापूर्वीच कामठी येथील सैनिक प्रशिक्षण केंद्र जीआरसी येथे नोकरी निमित्त येऊन जीआरसी क्वार्टर मध्ये वास्तव्यास होते.तर पंजाब येथील आंबला येथे शिकत असलेल्या मुलीच्या भेटीसाठी कुटुंबीय सदस्यांना पाठविन्याच्या बेतात अनावधानाने कामठी रेल्वेस्थानकावर घडलेल्या अपघातात सैनिकाचा जागीच मृत्यू झाला.मृतकाच्या पाठीमागे पत्नी , दोन मुली व एक मुलगा असा आप्तपरिवार आहे
– संदीप कांबळे