Published On : Wed, Oct 31st, 2018

सरदार वल्लभभाई पटेलांनी दिलेल्या एकतेचा संकल्प सर्वांनी वृद्धींगत करण्याची गरज – नितीन गडकरी

Advertisement

नागपूर,ता.३१. सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेल्या एकतेचा संकल्प आपण सर्वांनी वृद्धींगत करण्याची आज गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. राष्ट्रीय एकता दिन म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे एकता दौडचे आयोजन मंगळवार (ता.३१) रोजी संविधान चौकात करण्यात आले होते. त्याप्रसंगी तो बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आमदार सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, डॉ.मिलिंद माने, प्रा.अनिल सोले, कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, माजी महापौर प्रवीण दटके, कर आकारणी समिती सभापती संदीप जाधव, माजी महापौर अर्चना डेहनकर, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, क्रीडा अधिकारी नरेश सवाईतूल, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, ज्येष्ठ प्रशिक्षक भाऊ काणे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष शिवानी दाणी, जयप्रकाश गुप्ता, भोजराज डूंबे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाला एक सूत्रात बांधण्याचे काम केले. देशाला एकतेचा मंत्र दिला. आपण सर्वांनीही जात, पंथ, धर्म याच्यावर विचार करून एकोप्याने रहायला हवे. एकतेनेच देश समृद्ध होईल. वल्लभभाई पटेलांनी दिलेला एकतेचा संकल्प आपण सर्वांनी अंगीकारावा, असेही नितीन गडकरी यांनी प्रतिपादित केले.

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ही राष्ट्रीय एकता दिन म्हणून सर्वत्र साजरी करण्यात येते. या पार्श्वभूमीवर सर्व देशभरात एकता दौडचे आयोजन करण्यात येते. नागपूर महानगरपालिकेतर्फेही या दौडचे आयोजन दरवर्षी करण्यात येत असते. नागपूर महानगरपालिकेद्वारे आयोजित करण्यात आले या दौडमध्ये सतीश हलामी हा पुरूष गटात तर गीता चाचेरकर ही महिला गटात विजयी झाली. पुरूष गटात सतीश हलावे प्रथम, ज्ञानेश्वर पदा द्वितीय, नितीन पुगाटी तृतीय तर महिला गटात गीता चाचेरकर प्रथम, दिव्या नखाते द्वितीय, काजल कान्हापूरे तृतीय विजयी ठरले. विजेत्यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ऑल इंडिया युनीव्हर्सिटी टुर्नामेंटमध्ये यशस्वी कामगिरी केल्याबद्दल प्राजक्ता गोडबोले व तिचे प्रशिक्षक सुनील कापगते यांचा सत्कार करण्यात आला. इंटरनॅशनल ॲथलेटिक्स रेल्वे गेम्स मध्ये यशस्वी कामगिरी केल्याबद्दल मोनिका राऊत हिला देखील सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय उपविजेत्याचा किताब मिळवणा-या निखील शेंडेचाही गौरव या प्रसंगी करण्यात आला. कार्यक्रमाला शहरातील सर्व नगरसेवक व नगरसेविका प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement