Published On : Wed, Oct 31st, 2018

श्री साईप्रसाद महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिन साजरा

कन्हान :- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिना निमित्य सालवा येथील श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् महाविद्यालयात ‘राष्ट्रीय एकता दिन’ साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे आकर्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सालवा या गावापर्यंत निघालेली ‘ऐकता दौड’या दौड मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘एकतेवर’ पथनाट्य सादर केले.या पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी सर्व गावकऱ्यांना व उपस्थित प्रेक्षकांना ‘सर्व धर्म समभाव’ हा मौलिक संदेश दिला.

एकता दौड महाविद्यालयात पोहचुन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दीपप्रज्वलन करून एकतेची शपथ घेण्यात आली.तदनंतर मान्यवराचे मार्गदर्शन व्याख्यान झाले. याच कार्यक्रमात महाविद्यालयातिल कार्यकारी प्राचार्या डॉ. सौ.सुप्रिया पेंढारी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमात प्रा.वानखेडे, प्रा.धोटे, प्रा. काकडे, प्रा नितनवरे प्रामुख्याने उपस्तीत होते.

त्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंकी भोले हिने तर आभार नितेश वाडीभस्मे यांनी व्यकत केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सर्व प्राध्यापक विद्यार्थी व कर्मचारी रामेश्वर नागपुरे, नितीन कारेमोरे, पंकज वांढरे यांनी परिश्रम घेतले .