Published On : Thu, Jul 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

सावनेरमध्ये भीषण दुर्घटना; रेल्वेच्या धडकेत सख्ख्या दोन भावांचा जागीच मृत्यू

Advertisement

सावनेर : नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे गुरुवारी सकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. रेल्वेच्या धडकेत सख्ख्या दोन भावांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर सावनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे १०.१५ वाजताच्या सुमारास सावनेर येथील रेल्वे रुळांवरून जात असताना रेल्वेच्या धडकेत निरंजन लक्ष्मण फिरके (वय ४०) आणि योगेश लक्ष्मण फिरके (वय ३७) या सावनेर येथील सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या दुर्घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना अंकित हांडे यांनी दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक ऋतुजा जाधव यांना तातडीने कळविण्यात आले. माहिती मिळताच सावनेर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

हितज्योती आधार फाउंडेशनच्या सदस्यांनी तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

Advertisement

ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सावनेर पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून अपघातामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.