मुंबई : ठाकरे गटातील सहा खासदारांच्या शिंदेसेनेत प्रवेशाच्या हालचालींनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दिल्लीहून मुंबईत दाखल झालेल्या या खासदारांच्या पक्षांतरावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका करत गंभीर आरोप केले आहेत.
शिंदेसेनेत प्रवेशासाठी संबंधित खासदार मुंबईत पोहोचताच राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्यावर निशाणा साधला. “प्रत्येकी ५० कोटी रुपयांच्या मोबदल्यात हे खासदार विकले गेले आहेत,” असा आरोप करत त्यांनी बंडखोर नेत्यांवर सडकून टीका केली. तसेच भविष्यात त्यांच्या राजकीय भूमिकेची नोंद इतिहासात विश्वासघात म्हणूनच घेतली जाईल, असा टोला देखील त्यांनी लगावला.
दरम्यान, दिल्लीहून विशेष विमानाने मुंबईत आलेले हे सर्व खासदार कडक सुरक्षा व्यवस्थेत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी रवाना झाले. शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर त्यांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या गटात संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
पक्षांतराच्या या घडामोडींमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, आगामी काळात राज्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बंडखोर खासदार आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करणार असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष त्या घोषणेकडे लागले आहे.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





