Published On : Thu, Jul 16th, 2026
By Nagpur Today Nagpur News

संजय राऊतांकडून बावनकुळेंचं कौतुक; नागपुरातील बैठकीत राजकीय चर्चांना उधाण

Advertisement

नागपूर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत केलेल्या सकारात्मक वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नागपुरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राऊत यांनी बावनकुळे हे “संवाद साधण्यासाठी चांगले व्यक्तिमत्त्व” असल्याचे सांगितले.

18 जुलै रोजी नागपुरात आयोजित करण्यात येणाऱ्या सामूहिक रामरक्षा पठण आणि सभेच्या नियोजनासाठी संजय राऊत व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान काही पदाधिकाऱ्यांनी राऊत यांनी यापूर्वी भाजपमधील संभाव्य नेतृत्वबदलाबाबत केलेल्या वक्तव्याचा संदर्भ उपस्थित केला.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “चंद्रशेखर बावनकुळे हे संवाद साधण्यासाठी चांगले आहेत. विविध पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत.” तसेच भविष्यात भाजपमध्ये काही अंतर्गत बदल होऊ शकतात, असेही त्यांनी सूचित केले.

बैठकीत अंबादास दानवे यांनीही बावनकुळेंचे कौतुक करत, “ते सभागृहात सकारात्मक भूमिका घेणारे नेते आहेत. त्यांनी कधीही नकारात्मक भूमिका घेतलेली पाहायला मिळाली नाही,” असे म्हटले.

Advertisement

दरम्यान, ठाकरे गटाच्या वतीने 18 जुलै रोजी नागपुरातील राम मंदिर परिसरात सामूहिक रामरक्षा पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी चोरीच्या निषेधार्थ हे आंदोलन होणार असून, त्यानंतर मंदिराबाहेर जाहीर सभा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह विदर्भातील पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षातील नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत व्यक्त केलेल्या सकारात्मक मतांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.