Published On : Fri, May 15th, 2020

संजय निपाणे अतिरिक्त आयुक्तपदी म.न.पात रुजू

नागपूर : महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाचे आदेशानुसार नागपूर महानगरपालिके व रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्त रिक्त पदावर श्री. संजय निपाणे यांची नेमणूक केली आहे.

श्री. निपाणे यांनी आज (शुक्रवार) दुपारी अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारला आहे. श्री. संजय निपाणे यापूर्वी अमरावती महानगरपालिकेमध्ये आयुक्त म्हणून कार्यरत होते.