Published On : Tue, Jul 9th, 2019

संजय गांधी निराधार योजना समितीच्या सभेत 4 25 अर्जांना मंजुरी

कामठी:-कामठी तहसील कार्यालय च्या सभागृहात आयोजित तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या सभेत 425 अर्जांना मंजुरी देन्यात आली आहे

कामठा तालुका संजय गांधी निराधार योजना समिती चे अध्यक्ष अनिल निधान यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय सभागृहात आयोजित संजय गांधी निराधार योजनेसाठी 150 अर्ज, श्रावण बाळ निराधार योजनेअंतर्गत 275 अर्ज सादर करण्यात आली होती एकूण 425 अर्जांना संजय गांधी निराधार समितीचे सदस्य श्रीकांत शेंद्रे ,सुषमा सीलाम ,पांडुरंगा आंबिलदुके, रेखा भावे ,स्वप्नील फुकटे ,अविनाश हेडाऊ , निकेश कातोरे, नरेश मोहबे, हेमराज हटवार व नायब तहसीलदार आर टी उ के,बेबीनंदा झोटींग यांनी अर्जाची छाननी करून एकूण 425 अर्जांची निवड करून शासनाकडे आर्थिकमानधना करिता पाठविण्यात आले आहेत मंजूर झालेल्या सर्व लाभार्थ्या ना शषणाकडून आर्थिक अर्थसहाय्य प्राप्त होणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले

संदीप कांबळे कामठी