Published On : Tue, Jul 9th, 2019

मुख्यमंत्री सडक योजनेच्या कामांतर्गत केलेल्या पुलाला महिनाभरात पडल्या तडा

Advertisement

कंत्राटदाराची मनमानी,मनाई केल्या नंतरही केला सर्रास डस्ट चा वापर,सहाय्यक अभियंत्यांचे दुर्लक्ष,कंट्रातदाराशी साटेलोटे

टाकळघाट :- हिंगणा तालुक्यातील लखमापूर ते कीन्ही (भांसोली) या दोन गावांना जोडणारा समृद्धी महामार्गालगत राज्य मार्ग क्रं ३४४ कान्होलीबारा ते टाकळघाट या दोन रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम गत चार महिन्यापासून सुरू आहे.या रस्त्यांतर्गत निर्माण केलेल्या पुलाला महिनाभरातच भेगा/तडा पडल्याने संबधित कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लखमापूर ते कीन्ही(भांसोली) हा २.१८ किमी रस्ता मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत तयार केला जात असून या रस्त्याचे काम के के कन्स्ट्रक्शन कंपनीला १ करोड ७ लक्ष रुपयाला दिले.सदर काम करीत असलेला कंत्राटदार याने अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा फायदा घेत सूचना दिल्यानंतरही पुलाच्या काँक्रीट मध्ये रेती ऐवजी डस्ट वापरले. त्याच प्रमाणे फक्त छत्तीसगड राज्यातच विक्रीला असलेले सिमेंट सदर मुख्यमंत्री सडक योजनेच्या कामात वापरून शासनाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम केले आहे.त्यामुळेच पुलाला महिना भरातचं भेगा पडल्यामूळे संबधित बाबीला जवाबदार कोण?असा प्रश्न ग्रामस्थ निर्माण करीत आहे.

विशेष म्हणजे संबधित कामावर लक्ष ठेवण्याचे व कंत्राटदाराला दिशा निर्देश देण्याचे काम ज्या सहाय्यक अभियंत्याकडे आहे तो अधिकारी आपल्या वातानुकूलित केबिन मधून बाहेर न पडताच संबधित काम हे “ऑल इज वेल” सुरू असल्याचे वारीष्ठना सांगत असल्यामुळे त्या अधिकाऱ्याचे कंत्रातदाराशी साटेलोटे असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये ऐकाला येत आहे.तरी संबधित कामावर शासनाने करोडो रुपये खर्च करून ग्रामीण भागात विकास कामे पोहचविण्याचा त्यांचा मानस असून त्या कामात नफेखोरी करणारा कंत्राटदार व त्याला सहाय्य करणारा अधीकारी यांच्यावर कार्यवाही होणार का? हे आता बघण्यासारखे आहे

संदीप बलविर