| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Jul 9th, 2019

  चढ्यादराने रेल नीरची विक्री, डीआरएमने घेतली दखल

  नागपूर रेल्वे स्थानकावर कारवाई

  नागपूर: धावत्या रेल्वेत चढ्या दराने रेल नीर पाण्याची विक्री करणाºया पेट्रीकार कंत्राटदाराविरूध्द मध्य रेल्वे नागपूर विभागाने कारवाई केली. तसेच मुंबई मुख्यालयालाही तक्रार पाठविली आहे. ही कारवाई एका प्रवाशाच्या तक्रारीवरून करण्यात आली.

  सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार मुंबईहून पुरीला जाणारी एक्स्प्रेस सकाळी ५.४५ वाजता अकोला स्थाकावर थांबली. यावेळी काही प्रवासी जनरल बोगीत चढले. सकाळी ७.३० ते नागपूर स्थानक येईपर्यंत पेंट्रीकारचे वेंडर हे रेल्वे गाड्यात पाणी आणि नाश्ता विकत होते.

  रेल नीर पाणी विकणाºया वेंडरनी प्रवाशांना १५ रुपयाची बाटली चक्क २० रुपयास विकली. काही प्रवाशांनी मुकाट्याने २० रुपये दिले. मात्र, सुजान प्रवाशांनी वेंडरला खडेबोल सुनावले. १५ रुपये किंमत असताना तुम्ही २० रुपये कसे घेता? असा प्रश्न उपस्थित केला. परंतू वेंडरने बॉटल वीस रुपयाचीच असल्याचे पटवून सांगितले. रेल्वेचे नवे नियमाप्रमाणेच पाणी विकत असल्याचे तो म्हणाला. त्यामुळे या बोगीतून प्रवास करणाºया काही प्रवाशांनी थेट मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि विभागीय अधिकारी यांच्याकडे थेट तक्रार केली.

  नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी जवळपास सकाळी १०.०० वाजता आल्यानंतर उपस्टेशन व्यवस्थापक अतुल श्रीवास्तव हे जनरल बोगीजवळ दाखल झाले. त्यांनी प्रवाशांची तक्रारीची दखल घेत थेट पेंट्रीकार ची पाहणी करून कंत्राटदारास जाब विचारला. तसेच उपस्टेशन व्यवस्थापक दुबे यांनी कागदोपत्री कारवाई करीत वरिष्ठाकडे सविस्तर अहवाल पाठविला. तर याप्रकरणाची तक्रार थेट मुंबई झोनला पाठवित कंत्राटदार ओव्हरचार्ज करीत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्याकडून थेट दंड वसूल करण्यात यावी अशा सूचना सह तक्रार पाठविले असल्याची माहिती मध्य रेल्वेचे सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस.जी. राव यांनी दिली.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145