नागपूर: एका छोटेखानी समारंभात ज्येष्ठ नगरसेवक श्री. संजय बंगाले यांनी नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्त पदाचा शुक्रवार (४ जून) रोजी कार्यभार स्विकारला. ना.सु.प्र. कायदयानुसार नासुप्रच्या विश्वस्त मंडळावर म.न.पा.तर्फे एका सदस्याची नियुक्ती करण्यात येते. त्या अनुषंगाने यापूर्वी झालेल्या मनपाच्या महासभेत त्यांची निवड नासुप्रच्या विश्वस्त पदासाठी करण्यात आली होती.
महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी आमदार श्री. कृष्णा खोपडे व मोहन मते, उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती श्री. प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेता श्री. अविनाश ठाकरे, धरमपेठ झोन चे सभापती श्री. सुनिल हिरणवार, माजी महापौर मायाताई इवनाते, मावळते विश्वस्त व ज्येष्ठ नगरसेवक भुषण शिंगणे ज्येष्ठ नगरसेवक डॉ. रविन्द्र भोयर, नगरसेविका उज्वला शर्मा, नगरसेवक निशांत गांधी व सामाजिक कार्यकर्ता श्री. जयप्रकाश पारेख यांनी त्यांचे अभिनंदन केले.
