Published On : Mon, Apr 12th, 2021

आमडी व हिवरी गावात सॅनिटाईझर फवारणी करण्यात आली

Advertisement

पारशीवनी : – पाराशिवनी तालुक्यातील आमडी ग्राम पंचायत अंतर्गत आमडी,हिवरी गावात कोरोना संसर्ग विषाणु चा प्रादुर्भाव वाढत असुन कोरोना रूग्ण संख्या वाढत असल्याने महिला सरपंचा शुभागी भोस्कर व तालुका शिवसेना प्रमुख राजु भोस्कर हयानी टेकाडी (कोख)ग्राम पंचायत च्या सरपंचा सुनिता पृथ्वीराज मेक्षाम यांचे सह्कार्याने संबधित अधि का-यांशी चर्चा करून आमडी व हिवरी गावात सॅनिटाईझर फवारणी करण्यात आली.

मागील तीन आठवडया पासुन आमडी गावात कोरोना विषाणु चा प्रादुर्भाव वाढुन गावक-यासह प्रातिष्ठित नागारीक कोरोना बाधित झाले यामुळे कोरोना विषाणु वर प्रतिबंध म्हणुन आमडी गावा चे मुख्य रस्ते व गावातीला रास्ते व घरा वर आमडी ग्रा प सरपंचा शुभागी भोस्कर ,व तालुका चे सेना प्रमुख राजु भोस्कर हयांनी पारशिवनी पंचायत समिती चे खंड विकास अधिकारी अशोक खाडे साहेब यांचे मार्गदर्शनात टेकाडी (कोख)ची सरपंच सुनीता पृथ्वीराज मेश्राम यांचे सहर्कय ने आमङी व हिवरी गाव सॅनिटाईझर करण्याकरिता गाडी मागुन शनिवार (दि.९) ला आमडी व हिवरी गावात फवारणी गाडी व्दारे फवारणी करून दोन्ही गाव सॅनिटाईझर करण्यात आले. या प्रसंगी राजु भोस्कर,आमडी ग्रामपंचायत सचीव सुषमा मोरे मॅडम,ग्रा.प. कार्यालयाचे कर्मचारी संजय बघमार, वासुदेव लंजेवार.

ग्रामपंचायत टेकडी चा सरपंच सौ.सुनीता मेश्राम ताई यांनी आपल्या ग्रा.प. ची फोवारीन पंप फोवारणी करीता गाडी टेकाडी ग्रा.प.चे कर्मचारी उपलब्ध करून दिल्या बद्दल आमडी ग्राम पंचापत सरपंच शुभांगी राजु भोस्कर यांचा कडुन सरपंच टेकाडी सौ सुनीता ताई पृथ्वीराज मेश्रम यांचे सहकार्य चे गावात कौतुक होत आहे व आभार व्यकृत केले. सह गावकरी प्रामुख्याने उपस्थित राहुन सहकार्य केले.