Published On : Mon, Apr 12th, 2021

डॉक्टरही झाले हतबल! ना ऑक्सिजन, ना बेड; रुग्णांवर उपचार करायचे कसे? नागपुरात आंदोलन

Advertisement

नागपूर : ‘कोरोना’ संसर्गामुळे उपराजधानीत दहशत माजली असून दररोज बाधितांचे आकडे वाढत आहेत. सरकारी व खाजगी इस्पितळांमध्ये बेडच नसल्याने अनेक रुग्णांना उपचार मिळत नसल्याचे चित्र आहे.

उपचार सेवा व्यवस्थेकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या मुद्द्यावरून रविवारी रात्री मेडिकलच्या ‘मेडिसील कॅज्युएल्टी’समोर निवासी डॉक्टरांनी धरणे आंदोलन केले. रुग्णांसाठी अतिरिक्त उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्या, अशी त्यांची मागणी होती. सोमवारी दुपारी १ वाजता ते मनपा आयुक्तांची भेट घेणार आहेत.

डॉक्टरांनी ‘कोरोना’ नियमांचे पालन करत आपली नाराजी व्यक्त केली. जर प्रशासनातर्फे दोन दिवसांत रुग्णांसाठी अतिरिक्त व्यवस्था झाली नाही तर परत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉक्टरांनी दिला.