Published On : Fri, Nov 27th, 2020

संदीप जोशींच्या कर्तृत्वाला आमदारकी चे पंख द्या : डॉ. महात्मे

नागपुर – पदवीधर मतदार संघाच्या आगामी निवडणुकीसाठी संदीप जोशी यांच्या उमेदवारीच्या प्रचारार्थ धनगर समाज संघर्ष समिती द्वारे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. धनगर समाज संघर्ष समिती (म. रा.) चे संस्थापक अध्यक्ष आणि पद्मश्री पुरस्कृत नेत्रतज्ञ खासदार विकास महात्मे यांनी संदीप जोशी यांना क्रमांक १ चे मत देऊन प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

तरुण, तडफदार , धडाडीची कार्यशैली असणारे, नियोजन कौशल्यात नेहमीच चुणूक दाखविणारे , कुठलेही कार्य हाती घेतल्यानंतर ते पूर्णत्वास नेणारे, सभ्य , सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणजे संदीपजी जोशी. यांच्यासारखे तरुणच आज समाज परिवर्तनाचं कार्य करू शकतात म्हणूनच अश्या उमेदवाराला निवडून आणणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. महापौर म्हणूनही विशेषतः कोविड काळातही उत्कृष्ट कामगिरी त्यांनी पार पाडली हे विशेष.

याप्रसंगी धनगर समाज संघर्ष समितीचे सचिव श्री. हरीशजी खुजे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे श्री. महादेवराव पातोंड, मधुकरराव काळमेघ, ध.स.सं. समितीचे पदाधिकारी आगरकर, निघोट, शरद उरकुडे, डॉ विनोद बरडे, सौ वंदना बरडे, मनीष पोराटे, राजेश उपासे, लीलाराम लुचे, किशोर शेळके, धनविजय साटकर, दीपक टापरे व समस्त धनगर बांधव उपस्थित होते.