Published On : Mon, Jul 20th, 2026
By Nagpur Today Nagpur News

समृद्धी महामार्गावर उलटलेल्या इथेनॉल टँकरमुळे वाहतूक विस्कळीत!

पुढील दोन तासांत मार्ग सुरू होण्याची शक्यता
Advertisement

वर्धा : समृद्धी महामार्गावरील मुंबई–नागपूर मार्गिकेवर इंटरचेंज (आयसी) ८० जवळ रविवारी पहाटे सुमारे ३ वाजता इथेनॉल वाहून नेणारा टँकर उलटल्याने वाहतूक विस्कळीत झाली. टँकरमधील इथेनॉल अत्यंत ज्वलनशील असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने विशेष दक्षता घेत बचाव व मार्ग पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

घटनास्थळी महामार्ग सुरक्षा पथक (एचएसपी), वर्धा पोलीस, अग्निशमन दल, एमएसआरडीसी तसेच तज्ज्ञ यंत्रणांची पथके तैनात करण्यात आली आहेत. टँकर हटवण्यापूर्वी त्यातील इथेनॉल सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये उतरवण्याचे काम सुरू असून त्यानंतर जड यंत्रसामग्रीच्या सहाय्याने टँकर हटवण्यात येणार आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, इथेनॉल उतरवणे, टँकर हटवणे आणि अंतिम सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतर पुढील सुमारे दोन तासांत मुंबई–नागपूर मार्गिकेवरील वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

वाहतूक सल्ला
नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी वर्ध्यापर्यंत समृद्धी महामार्गाचा वापर टाळावा. त्याऐवजी नागपूर–अमरावती महामार्गाने प्रवास करून अमरावती गेट इंटरचेंज येथून पुन्हा समृद्धी महामार्गावर प्रवेश करावा.
मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या वाहनांनी अमरावती गेट इंटरचेंज येथे समृद्धी महामार्ग सोडून नागपूर–अमरावती महामार्गाने नागपूरकडे प्रवास करावा.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत असून प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन महामार्ग वाहतूक पोलिसांनी केले आहे. पुढील दोन तासांत महामार्ग सुरू करण्याबाबतचे अद्ययावत निवेदन जारी करण्यात येणार असल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.