Published On : Mon, Jul 20th, 2026
By Nagpur Today Nagpur News

‘कॉक्रोच’चा आज संसद मार्च; परवानगी नाकारल्यानंतरही मोर्चावर ठाम, दिल्लीत कडेकोट बंदोबस्त

Advertisement

नवी दिल्ली : केंद्रीय परीक्षांमधील कथित पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांच्या मागण्यांसाठी ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या नेतृत्वाखाली आज (सोमवारी) संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी आंदोलकांनी माघार घेण्यास नकार दिल्याने राजधानीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसद मार्ग, जंतरमंतर आणि सफदरजंग रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही संवेदनशील भागांत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

‘नीट’सह विविध केंद्रीय परीक्षांमधील कथित पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. देशभरातून मोठ्या संख्येने तरुण दिल्लीकडे रवाना झाले असून जंतरमंतर परिसरात आंदोलकांची गर्दी वाढत आहे. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, दोषींवर कठोर कारवाई आणि उत्तरदायित्व निश्चित करण्याची आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.

दरम्यान, उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी त्यांना मेदांता रुग्णालयात हलवण्याची मागणी दिल्ली उच्च न्यायालयात केली होती. मात्र, वांगचुक यांच्या प्रकृतीची काळजी घेऊनच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे नमूद करत न्यायालयाने ही मागणी फेटाळली.

Advertisement

गीतांजली आंगमो यांनी सांगितले की, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा आणि उत्तरदायित्वाचा मुद्दा प्रभावीपणे मांडण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधींनी दिल्यास सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्यास तयार आहेत.

रुग्णालयातून देशवासीयांना लिहिलेल्या पत्रात सोनम वांगचुक यांनी या मोर्चाला “स्वातंत्र्याचे दुसरे आंदोलन” असे संबोधत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. भयमुक्त आणि अन्यायमुक्त भारतासाठी शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात लढा सुरू ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.