Published On : Wed, Nov 6th, 2019

संभाजी ब्रिगेड नांदगाव व्दारे मंडई उत्सव थाटात साजरा

जंगी दुय्यम खंडी गम्मत व मराठ मोळी लावणी ने श्रौते मंत्रमुग्ध.

कन्हान : – दिवाळीच्या पावन पर्वा निमित्त संभाजी ब्रिगेड नांदगाव व्दारे जंगी दुय्यम खंडी गम्मत व मराठमोळी लावणीच्या मनोरंजत्माक कार्यक्रमाच्या मेजवानी सह नांदगाव ला मंडई उत्सव थाटात साजरा करण्यात आला.

ग्रामीण भागातील पारंपरिक लोकक लावंताची लोककला जोपासुन दिवाळी निमित्त आलेल्या गावातील मुली, जावई व पाहुणे मंडळीना मनोरंजत्माक प्रबोध नाच्या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामीण गाव, खेडोपाडी मंडई उत्सव हे माध्यम आजही आधुनिक युगात महत्त्वाची भुमिका पार पाडत असल्याने संभाजी ब्रिगेड नांदगाव व्दारे सोमवार (दि.४) ला सकाळी १० ते ७ वाजेपर्यंत शाहीर मधुकर शिंदेमेश्राम व संच तुर्रा पार्टी मु. नांदगाव (एंसबा) विरूध्द शाहीर धर्मदास देवगडे व संच कलंगी पार्टी मु. कळमना वस्ती , नागपुर यांच्या जंगी दुय्यम खडी गम्मती च्या माध्यमातुन मनोरंजत्माक प्रबोधन करित उपस्थितां ची दिवसभर गर्दी कायम ठेवली. रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत मराठमोळी लावणीच्या कार्यक्रमाने उपस्थित श्रौत्याना मंत्रमुग्ध करित सुंदर मेजवानी सादर केली. मंडई उत्सवाचा नांदगाव व परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला.

कार्यक्रमाचे आयोजन ग्राम पंचायत नांदगाव सरपंचा सौ सोनाली वरखडे, उपसरपंच सेवक ठाकरे, सदस्य रवि रच्छोरे, अज्जु पटेल, सदस्या सौ मायाबाई पु-हे, सौ प्रियंका यादव, सौ लता ठाकरे, सौ विमलबाई धुर्वे, पोलीस पाटील संतोष ठाकरे आदीच्या मार्गदर्शनात संभाजी ब्रिगेड नांदगाव चे अध्यक्ष तुषार ठाकरे, उपाध्यक्ष निलेश गिरी, मनोज वरखडे, आकाश रच्छोरे, मिलींद देशभ्रतार, प्रशांत रच्छोरे, चेतन ठाकरे, रामेश्वर ठाकरे, प्रितम उके, योगेश ठाकरे, आशिष रच्छोरे, हिरालाल धानोले, राजेश बागडे, चक्रधर ठाकरे, संतोष उपाध्य, धिरज रच्छोरे, गणेश भाऊ, तुषार भाऊ, बाबुलाल भाऊ, प्रदीप भाऊ, प्रकाश भाऊ, राजेंद्र भाऊ, प्रशांत भाऊ आदीने कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता परिश्रम घेतले असुन समस्त गावकरी बांधवांनी मौलिक सहकार्य केले.